उद्धव ठाकरेंना पुन्हा धक्का | एकनिष्ठतेचे प्रमाणपत्र दिलेले पदाधिकारी शिंदे गटात सामील

 

मुंबई | सर्वोच्च न्ययालयात ५ न्यायाधीशांसमोर झालेल्या सुनावणीत घटनापीठाने निवडणूक आयोगाच्या कामकाजात हस्तेक्षेप करण्यास नकार दिला. त्यानंतर शिवसेनेला आता निवडणूक आयोगा समोरील लढाईला सामोरे जावे लागणार असल्याचे चित्र स्पष्ट झालं. मात्र आता शिवसेनेसमोर मोठी अडचण निर्माण झाल्याचे समोर आले आहे. रत्नागिरीतील ज्या पदाधिकाऱ्यांनी एकनिष्ठतेचे प्रमाणपत्र दिले तेच शिंदे गटात दाखल झाल्याचे समोर आले आहे.

निवडणूक आयोगाची लढाई शिवसेनेसाठी सोपी नाही. पक्षचिन्ह आणि शिवसेना पक्ष टिकवण्यासाठी मोठी कसरत यावेळी उद्धव ठाकरेंना करावी लागणार आहे. यासाठी पक्षासंबंधीचे सर्व पुरावे निवडणूक आयोगासमोर सादर करावे लागणार आहे. म्हणूनच शिवसेनेने पक्ष सदस्यांकडून एकनिष्ठतेचे प्रमाणपत्र घेण्यास सुरुवात केली होती. मात्र एकनिष्ठ असल्याचे सांगत ज्यांनी प्रमाणपत्र दिले तेच शिंदे गटात सामील झाल्याने उद्धव ठाकरेंच्या अडचणीत वाढ होऊ शकते.

शिवसेनेचे गुहागरमधील 6 पदाधिकाऱ्यांनी शिंदे गटात प्रवेश केलाय. गुहागरमधील शिवसेनेचे चार पदाधिकारी आणि दोन सरपंच शिंदे गटात सामील झाले. युवासेना प्रमुख अमरदिप परचूरे, युवासेना तालुकाप्रमुख सुमेध सुर्वे, युवासेना आंबलोली शाखा प्रमुख सुमेध सुर्वे, मंढरेचे सरपंच सुशिल आंग्रे, मासूचे सरपंच प्रकाश भोजने यांनी शिंदे गटात प्रवेश केला असल्याचे समोर आलं आहे.

Team Global News Marathi: