भुजबळांच्या समर्थनार्थ राष्ट्रवादीने महापुरुषांच्या प्रतिमा शाळांना सप्रेम भेट

राष्ट्रवादीचे नेते आणि माजी मंत्री छगन भुजबळ यांनी केलेल्या वादग्रस्त विधानावरून त्यांच्यावर टीका होत असतांना त्यांच्या समर्थनार्थ त्यांचे कार्यकर्ते मैदानात उतरले आहे.राष्ट्रवादीच्या युवक कॉँग्रेसच्या शहराध्यक्ष आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी महापलिकेच्या शाळेत जात महापुरुषांच्या प्रतिमा शाळांना सप्रेम भेट दिल्या आहेत.

गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी केलेल्या वक्तव्यामुळे राज्यभरात निषेध व्यक्त करण्यात येत आहे. नाशिकमध्ये भाजप पदाधिकाऱ्यांनी सरस्वतीची पूजा करत भुजबळांविरोधात आंदोलन केले आहे. त्यानंतर आज नाशिख्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी भुजबळांच्या समर्थनार्थ रस्त्यावर उतरून भुजबळांच्या भूमिकेला पाठिंबा दिला. नाशिक- सातपुर परिसरात राष्ट्रवादी युवक कॉँग्रेसच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी प्रतिमा भेट देत भुजबळांनी केलेल्या वक्तव्याचे एकप्रकारे समर्थन केले आहे.

छगन भुजबळ यांनी केलेल्या विधानावरुन राज्यातील वातावरण तापले आहे. त्यातच भुजबळ यांच्यावर जहरी टीका होऊ लागल्याने राष्ट्रवादीने भुजबळ यांची बाजू लावून धरण्यासाठी एकप्रकारे महापुरुषांच्या प्रतिमा वाटप करण्याची मोहीम हाती घेतली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनी केलेल्या सरस्वती आणि महापुरुषांचे फोटो या प्रकरणावरून थेट त्यांच्या भुजबळ फार्मवर भाजप निषेध आंदोलने करीत आहे. विविध संघटनांकडून छगन भुजबळ यांच्या विरोधात आंदोलनांची तयारी केली जात असतांना भुजबळांच्या समर्थनार्थ युवक राष्ट्रवादी सरसावली आहे.

Team Global News Marathi: