ठाकरे गटाचे आमदार आणि माजी परिवहन मंत्री अनिल परब यांच्या कार्यालयावर म्हाडाकडून कारवाई झाल्यानंतर शिंदे-भाजप पक्ष आणि ठाकरे गटात वाद पेटला आहे. आमदार अनिल परब यांच्या कार्यालयावर कारवाई सुरू झाल्यापासून दोन्ही गट आमने सामने आले आहेत. तर अनिल परब यांच्या कार्यालयावरील कारवाईवरून भाजपचे आमदार नितेश राणे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर अत्यंत खालच्या पातळीवर टीका केली.
उद्धव ठाकरे नामर्द असल्याची टीका राणे यांनी केली आहे. अनिल परब यांच्या बांद्र्यातील कार्यालयावर झालेल्या कारवाईवरून ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे.अनिल परब हा मातोश्रीच्या कारकून असल्याची हल्लाबोल त्यांनी केला आहे. निलेश राणे यांच्या या टीकेमुळे पुन्हा एकदा उद्धव ठाकरे गट आणि राणे कुटुंबीय यांच्यात संघर्ष पाहायला मिळणार आहे. यापूर्वी सुद्धा नितेश राणे यांनी ठाकरे कुटुंबियांवर टीका केली होती.
तर अनिल परब यांचे घर तर फक्त झाकी असून मातोश्री बाकी आहे, असा इशाराही नितेश राणे यांनी अनिल परब यांच्यासह उद्धव ठाकरे यांना दिला. तसेच अनिल परब यांनी सुक्या धमक्या देवू नये आमच्या घरात येवून धिंगाणा घालणे इतके सोपे नाही. ही काही मातोश्री नाही अशी टीका त्यांनी त्यांच्यावर केली आहे.