उद्धव ठाकरेंना मोठा धक्का,तब्बल ७ राज्यातील प्रमुखांचा थेट एकनाथ शिंदेंना पाठिंबा

 

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर महाराष्ट्रात मोठा राजकीय भुकंप झाला होता . शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना राज्याच्या कानाकोपऱ्यातून बसणारे धक्के ताजे असतानाच आता महाराष्ट्राबाहेरुनही हादरे मिळाल्याचं समोर आलं. दहा राज्यातील शिवसेनेच्या प्रमुख नेत्यांची मंगळवारी मुंबईत बैठक झाली. यावेळी दिल्ली, पश्चिम बंगाल, उत्तर प्रदेशसह आठ राज्यातील शिवसेनेच्या बड्या नेत्यांनी ठाकरेंची साथ सोडून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना समर्थन दिल्याचा दावा करण्यात आला.

एकनाथ शिंदे यांनी बंड पुकारत महाराष्ट्रात शिवसेनेला खिंडार पाडले. ४० आमदार, १० समर्थक विधिमंडळ सदस्य, १२ खासदार, अनेक नगरसेवक, पदाधिकारी, शिवसैनिक शिंदेंच्या पाठीशी आले. त्यानंतर ठाकरेंच्या गटाला लागलेली गळती काही केल्या थांबताना दिसत नाही. राज्याच्या विविध भागातून शिंदे गटात प्रवेश सुरुच आहेत. अशातच देशाच्या विविध भागांतूनही ठाकरेंना धक्का बसला आहे.

देशभरातील शिवसेनेच्या दिग्गज नेत्यांची मंगळवारी मुंबईत बैठक झाली. या बैठकीत सहभागी झालेल्या दहा पैकी आठ राज्यांतील शिवसेना प्रमुखांनी एकनाथ शिंदेंना समर्थन देण्याचा निर्णय घेतल्याचा दावा करण्यात आला. दिल्ली, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल, बिहार, गोवा, मणिपूर, छत्तीसगड या राज्यांचा समावेश होतो.

आगामी काळात खरी शिवसेना कोणाची, धनुष्यबाण हे शिवसेनेचे अधिकृत निवडणूक चिन्ह कोणाकडे जाणार, यासारखे प्रश्न सुप्रीम कोर्ट किंवा निवडणूक आयोगाकडे प्रलंबित आहेत. अशा वेळी या बड्या नेत्यांचं समर्थन निर्णायक ठरु शकतं. शिवसेनेच्या घटनेत राज्याबाहेरील पदाधिकाऱ्यांचं मतही ग्राह्य धरलं जाणार असल्याचा उल्लेख असल्यामुळे शिंदेंनी त्यांनाही आपल्या बाजूने वळवण्याचा प्रयत्न केल्याचे दिसते.

Team Global News Marathi: