राज्य सरकारविरोधात राष्ट्रवादीचं पुण्यात ‘लॉलीपॉप आंदोलन’

 

वेदांता-फॉक्सकॉन प्रकल्प गुजरातला गेल्यामुळे राष्ट्रवादीचे नेते आक्रमक झाले आहेत. त्यामुळे त्यांंनी महाराष्ट्रभर सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींविरोधात आंदोलन पुकारलं आहे. पुण्यात देखील खासदार सुप्रिया सुळे यांच्या उपस्थिती राष्ट्रवादीतर्फे हातात लॉलीपॉप घेत आंदोलन करुन निदर्शनं केली. पुण्यातील जंगली महाराज रस्त्याजवळील झाशीची राणी पुतळ्याजवळ हे आंदोलन केलं.

“महाराष्ट्राला काय मिळालं? लॉलीपॉप लॉलीपॉप..” अशाप्रकारच्या अनोख्या घोषणाबाजी करत त्यांनी हे आंदोलन केलं. राज्य सरकारवर टीका करण्यासाठी राष्ट्रवादीचे नेते कायम वेगवेगळ्या प्रकारचे आंदोलनं करत असतात. यावेळी त्यांनी लॉलीपॉप हाती घेत निदर्शनं केली. फॉक्सकॉन प्रकल्पावरुन आता महाराष्ट्राचं राजकारण तापताना दिसत आहे.

महाविकास आघाडी सरकारच्या काळात अंतिम झालेला सेमीकंडक्टरचा प्रकल्प भाजपमुळे गुजरातमध्ये गेल्याचा आरोप नेत्यांकडून केला जात आहे. हा प्रकल्प महाराष्ट्राबाहेर नेल्यानंतर यापेक्षा मोठे प्रकल्प महाराष्ट्राला देऊ असं आश्वासन केंद्र सरकारकडून देण्यात आलं आहे. मात्र हे आश्वासन फोल आहे. या सगळ्यात महाराष्ट्राला लॉलीपॉप देण्यात आलं आहे, असं राष्ट्रवादीचं म्हणणं आहे.

Team Global News Marathi: