उद्धव ठाकरेंना भेटणार हा नवा मित्र?; एकनाथ शिंदे-देवेंद्र फडणवीसांसमोर मोठं आव्हान

 

राज्यात सत्तांतर झाल्यापासून महाविकास आघाडीविरुद्ध भाजपा-शिंदे गट अशी लढाई पाहायला मिळत आहे. त्यात शिवसेना ठाकरे गटाने अलीकडेच संभाजी ब्रिगेडसोबत युती केली आहे. आता ठाकरे गटाला आणखी एक मित्र मिळण्याची शक्यता आहे.

उद्धव ठाकरे शिवशक्ती आणि भीमशक्तीचा प्रयोग पुन्हा करू शकतात. त्यासाठी उद्धव ठाकरेंनी प्रकाश आंबेडकरांशी चर्चा केल्याची माहिती आहे. लवकरच हे दोन्ही नेते एकमेकांना भेटण्याची शक्यता असून त्यातून नवं राजकीय समीकरण उदयास येण्याची शक्यता राजकीय वर्तुळात वर्तवली जात आहे.

गेल्या महिन्यात १५ तारखेला प्रकाश आंबेडकर यांनी काँग्रेस-शिवसेना ठाकरे गटाला युतीसाठी प्रस्ताव दिल्याचं सांगितले होते. आता ठाकरे गटाने वंचितच्या दिशेने १ पाऊल पुढे टाकत उद्धव ठाकरे आणि प्रकाश आंबेडकर यांच्यात फोनवरून चर्चा झाली असून त्यात वंचित-ठाकरे गट युतीशी बोलणी झाल्याची माहिती आहे.

२० किंवा २१ तारखेला प्रकाश आंबेडकर आणि उद्धव ठाकरे यांची भेट होण्याची शक्यता आहे. या भेटीनंतर वंचित बहुजन आघाडी आणि शिवसेना ठाकरे गट यांच्यात युती होऊ शकते असं बोललं जात आहे. स्वत: प्रकाश आंबेडकरांनी याआधीच युतीबाबत भूमिका जाहीर केली होती.मेधा ठाकूर वंचितच्या प्रदेशाध्यक्षांनी आम्ही युती करण्याची वेळ आली तर काँग्रेस किंवा शिवसेना ठाकरे गटाशी युती करू अशी भूमिका मांडली होती.

Team Global News Marathi: