उद्धव ठाकरेंचे शिवसेनेत योगदान किती ? नारायण राणेंचा सवाल

 

मुंबई | भाजपा नेते आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे, खासदार संजय राऊत यांच्यावर हल्लाबोल केला. शिवसेना मोठी करण्यात माझं योगदान आहे, असे म्हणत राणे यांनी उद्धव ठाकरेंवर टीकेची झोड उडवली त्या उद्धव ठाकरेंचे शिवसेनेत योगदान किती? आताचे शिवसैनिक हे आयत्या बिळावर नागोबा आहेत, अशी टीका राणे यांनी केली. उद्धव ठाकरे अडीच वर्ष मुख्यमंत्री पदावर बसले. पण त्यांनी काय केले? असा सवालही राणे यांनी उपस्थित केला.

कोकणसाठी फक्त बढाया मारल्या. पण केलं काय? विमानतळ मी केले . विनायक राऊत विरोध करत होते. त्याला टक्केवारी हवी होती, असा घणाघातही राणे यांनी केला. सुशांतसिंह राजपूत प्रकरणाची चौकशी लागल्यानंतर पिल्लू गप्प झाले,असे म्हणत राणे यांनी आदित्य ठाकरेंवर निशाणा साधला. भांडूपमध्ये कोकण महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते.

संजय राऊत हे आता तुरुंगातच जातील असा दावाही राणे यांनी केला. मुंबईमध्ये जवळच टिनपाट संपादक राहतो. मराठी माणसासाठी कोण काम करतय हे पाहा. त्यामुळे संजय राऊत तोंड बंद कर. मी देशात काम करतोय. तू खाल्लेल्या मिठाला जाग. माझ्या वाटेला कोणी जात नाही म्हणून संजय राऊत पोलीस सुरक्षेत राहा. नाहीतर जेलमध्ये जा, असा इशारा राणे यांनी राऊतांना दिला.

उद्धव ठाकरेंनी शिवालयात संजय राऊतच्या विरोधात उमेदवार तयार ठेवला होता. पण मला बाळासाहेबांनी याचे नाव सांगितले होते. याचे नाव इलेक्शनच्या यादीत नव्हते. त्याला काँग्रेसच्या रोहिदास पाटील यांनी विरोध केला. हा खासदार बनवायला खर्च मी केला, असा खुलासाही राणे यांनी यावेळी केला. नारायण राणे शिवसेनेत असताना कोणी शिवसेनेतून बाहेर जात होतं का? आणि आता दिवसाढवळ्या जात आहेत. शिवसेनेची आताची अवस्था प्रचंड वाईट आहे. 40 आमदार दिवसाढवळ्या निघून जातात. अन् खोके घेऊन आमदार गेल्याचं हे म्हणत आहेत.

 

Team Global News Marathi: