Monday, January 30, 2023
  • राजकारण
  • जनरल
  • मनोरंजन
    • सुविचार
    • Success Story
  • व्हिडीओ
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • कृषी
  • वाढदिवस विशेष
  • नौकरी
  • देश विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • जनरल
  • मनोरंजन
    • सुविचार
    • Success Story
  • व्हिडीओ
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • कृषी
  • वाढदिवस विशेष
  • नौकरी
  • देश विदेश
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
No Result
View All Result

उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसादिनी निष्ठा यात्रेतून कोल्हापुरात शिवसैनिकांचे जोरदार शक्तीप्रदर्शन

by Team Global News Marathi
July 27, 2022
in महाराष्ट्र
0
उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसादिनी निष्ठा यात्रेतून कोल्हापुरात शिवसैनिकांचे जोरदार शक्तीप्रदर्शन

 

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आज 62 व्या वर्षात पदार्पण करत असून त्यांचा वाढदिवस शिवसैनिकांकडून मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. बाळासाहेबांच्या माघारी शिवसेना समर्थपणे सांभाळणारे उद्धव ठाकरे यांच्यासमोर एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडानंतर मोठे आव्हान ठाकले आहे. संकटात असलेल्या उद्धव ठाकरे यांना प्रेम दाखवून देण्यासाठी शिवसैनिकांनी ठिकठिकाणी गर्दी केली आहे.

कोल्हापूरमध्ये उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त शिवसैनिकांकडून निष्ठा यात्रा काढण्यात आली. यावेळी शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी आपले शक्तीप्रदर्शन करत नेते जरी बाजूला झाले असले तरी आम्ही लढण्यासाठी कमी नाही हे दाखवून देण्याचा प्रयत्न केला. शिवसैनिकांसह महिलांचाही उस्फूर्तपणे निष्ठा यात्रेत सहभाग दिसून आला.

तसेच फटाक्यांची आतषबाजी त्याचप्रमाणे शिवसेना जिंदाबाद अशा घोषणांनी शिवसैनिकांनी यावेळी परिसर दणाणून सोडला. दसरा चौकातून प्रारंभ झाला. यावेळी उद्धव ठाकरे तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है अशा घोषणाही यावेळी शिवसैनिकांनी दिल्या. शिवसेना शहर प्रमुख रविकिरण इंगवले व सुनील मोदी यांनी रॅलीचे नेतृत्व केले.

दरम्यान, आदित्य ठाकरे महाराष्ट्र पिंजून काढताना थेट बंडखोरांच्या मतदारसंघांमध्ये जाऊन सभा घेत असल्याने त्यांना चांगलाच प्रतिसाद मिळत आहे. मराठवाड्यात मिळालेल्या प्रचंड प्रतिसादानंतर आदित्य ठाकरे कोकणात जाणार आहेत. तेथील दौरा पूर्ण करून ते कोल्हापूर जिल्ह्यामध्ये येत आहेत.१ ऑगस्टला संध्याकाळी आदित्य ठाकरे कोल्हापुरात दाखल होतील. आदित्य ठाकरे यांच्या दौऱ्याचा कार्यक्रम आज संध्याकाळी निश्चित होणार असल्याची माहिती कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघ शिवसेना शहर प्रमुख सुनील मोदी यांनी दिली.

पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित केलेल्या रॅलीमध्ये ते बोलत होते. एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडाळीनंतर कोल्हापूर जिल्ह्यामध्ये शिवसेनेला अभूतपूर्व भगदाड पडले आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील एकमेव शिवसेना आमदार प्रकाश आबिटकर, अपक्ष आमदार राजेंद्र पाटील-यड्रावकर, शिवसेना खासदार संजय मंडलिक आणि धैर्यशील मानेही शिंदे गटाला जाऊन मिळाले आहेत. माजी आमदार राजेश क्षीरसागर हे सुद्धा शिंदे गटात सामील झाले आहेत.

दोन झारीतल्या शुक्राचार्यांमुळे ओबीसी आरक्षण मिळत नव्हत – चंद्रशेखर बावनकुळे

उद्धव ठाकरेंना शुभेच्छा देणाऱ्या जाहिराती ‘सामना’नं नाकारल्या; शिंदे गटाचा दावा

 

Share this:

  • Click to share on Facebook (Opens in new window)
  • Click to share on Twitter (Opens in new window)
  • Click to share on WhatsApp (Opens in new window)
ADVERTISEMENT
Next Post
राष्ट्रवादीचा सर्वाधिक फटका पुणे जिल्ह्यातील शिवसैनिकांना, आढळराव पाटलांनी व्यक्त केली खदखद

माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटलांकडून उद्धव ठाकरेंना वाढदिवसाच्या शुभेच्छा !

Recent Posts

  • कोल्हापुरात धक्कदायक प्रकार शिक्षकानेच दाखवलं नववी-दहावीतील मुलींना पॉर्न व्हिडीओ
  • अभिनेत्री राखी सावंत हिच्यासाठी मराठमोळ्या अभिनेत्याची भावुक पोस्ट
  • महात्मा गांधींच्या पुण्यतिथीनिमित्त स्वरा भास्करचं ट्विट, झाली ट्रोल
  • “पुरक वातावरण नसल्यानेच उद्योग आले नाहीत,माझी PMO ला विनंती आहे की..”
  • चंद्रकांत खैरे यांच्या मुलाची ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर वायरल, थेट बदलीसाठी घेतले इतके रुपये

Website maintained by Tushar Bhambare.

No Result
View All Result
  • राजकारण
  • जनरल
  • मनोरंजन
    • सुविचार
    • Success Story
  • व्हिडीओ
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • कृषी
  • वाढदिवस विशेष
  • नौकरी
  • देश विदेश
  • महाराष्ट्र

Website maintained by Tushar Bhambare.

WhatsApp Group