उद्धव ठाकरेंच्या राजीनाम्यानंतर आज एकनाथ शिंदे मुंबईत होणार दाखल

 

शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी अखेरीस मुख्यमंत्री राजीनामा दिल्यामुळे गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या वादावर अखेर कायमच पडदा पडला आहे. उद्धव ठाकरे यांनी आपल्या राजीनामा दिला आहे. मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्याला कारणीभूत असलेले एकनाथ शिंदे अखेर आता समोर आले आहे. एकनाथ शिंदे आजच मुंबईत येणार आहे.

शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे रात्रीच गोव्यात दाखल झाले होते. आपल्या बंडखोर आमदारांसह शिंदे ताज हॉटेलवर मुक्कामी आहे.उद्धव ठाकरेंनी राजीनामा दिल्यानंतर एकनाथ शिंदे गट आता मवाळ झाला आहे. शिवसेना नेते एकनाथ शिंदे आणि त्यांच्या समर्थक आमदारांची आज सकाळी ९ वाजता ताज रेसिडेंसी हॉटेलमथ्ये बैठक होणार आहे. या बैठकीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा राजीनामा दिल्या नंतर पुढील राजकीय रणनितीवर चर्चा होणार आहे. शिवसेना नेते एकनाथ शिंदे आणि त्यांचे समर्थक आमदार आज मुंबईत परतण्याची शक्यता आहे.

दरम्यान,उद्धव ठाकरे यांच्या राजीनाम्यानंतर आता देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात नव सरकारचा 1 जुलैला शपथविधी होण्याची शक्यता आहे. सुत्रांनी ही माहिती दिली आहे. उद्या भाजप सत्तास्थापनेचा दावा करणार आहे. देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे हे दोन्ही नेते 1 जुलैला शपथ घेण्याची शक्यता आहे.

Team Global News Marathi: