उद्धव ठाकरे सात्विक अन् प्रामाणिक माणूस; मात्र ते…

 

अमित शहा यांच्या दौऱ्यानंतर राज्यातील वातावरण पुन्हा तापले असून यावर आता प्रहार संघटनेचे सर्वेसर्वा आणि कधीकाळी उद्देजव ठाकरे यांच्या मंत्री मंडळातील सहकारी बच्चू कडू यांनी भाष्य केले आहे. अमित शहा आणि उद्धव ठाकरे यांच्यात कोण खरं बोलतं? हे त्या दोघांनाच माहित. मात्र उद्धव ठाकरे हे प्रामाणिक आणि सात्विक असून ते सेनाभवनमध्ये जेवढे शोभून दिसायचे तेवढे वर्षा बंगल्यावर नव्हते, हे दुर्दैव असल्याचा टोला बच्चू कडू यांनी लगावला आहे.


उद्धव ठाकरे हे पक्षप्रमुख म्हणून शोभत होते, मात्र मुख्यमंत्री म्हणून अडचणीचे होते, हे सत्य असल्याचं कडू यांनी सांगितलं. करमाळा येथील श्री कमलाभवानी रक्तपेढी लोकार्पण समारंभासाठी आमदार बच्चू कडू उपस्थित होते. या कार्यक्रमावेळी ते बोलत होते. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे विशेष कार्य अधिकारी मंगेश चिवटे यांचा नागरी सत्काराच्या कार्यक्रमानंतर बच्चू कडू बोलत होते.

राज्यातील मंत्रिमंडळ विस्ताराच्या तोंडावर अनेक नेत्यांच्या पक्षप्रवेशाच्या चर्चा रंगू लागल्या असल्या तरी जेवढा विस्तार लांबेल तेवढी प्रवेश करणाऱ्यांची गर्दी वाढेल, असा टोलाही बच्चू कडू यांनी यावेळी लगावला आहे. मी राजकारणी असल्यानं मला मंत्रिपदाची अपेक्षा आहे, अशी कबुली देताना मंत्रिपदामुळे लोकांची कामं होतात, तसा माझाही स्वार्थ असल्याचं कडू यांनी सांगितलं. दिल्ली प्रमाणे महाराष्ट्रात आरोग्य व्यवस्था असणं गरजेचं असून त्यामुळे आता मुख्यमंत्र्यांनी आणि आरोग्यमंत्र्यांशी बोलून अशा सुविधा तयार कराव्या अशी मागणी करणार असल्याचं त्यांनी यावेळी बोलताना सांगितलं

Team Global News Marathi: