आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याच्या कुटुंबीयांस आमदाराकडून २ हजारांची मदत

महाराष्ट्रात शेतकरी आत्महत्या प्रमाण आता दिवसेंदिवस वाढताना दिसून येत आहे अशातच यवतमाळ जिल्ह्यात आणखी एका शेतकऱ्याने आत्महत्या करत जीवन संपवले. मात्र, या पीडित कुटुंबीयांचे सांत्वन करण्यासाठी गेलेल्या आमदाराने चक्क बंद खाकी पाकिटात २ हजार रुपयांची मदत देऊन जखमेवर मीठ चोळल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

उमरखेड तालुक्यातील हिरामण नगर -निंगणुर येथील शेतकरी चंपत नारायण जंगले यांनी कर्जबाजारी व नापिकीला कंटाळून आत्महत्या केली होती. त्या आत्महत्याग्रस्त कुटुंबाला आमदार नामदेवराव ससाने यांनी भेट देऊन बंद लिफाफामध्ये दोन हजारांची भेट दिली.आमदार महोदयांनी आत्महत्याग्रस्त कुटूंबाची एक प्रकारे थट्टाच केल्याचं दिसून आलं.

मात्र या प्रकरणाचा गाजावाजा होताच आमदार ससाणे यांनी आपल्या कार्यकर्त्यांकडून आणखी तीन हजार रुपये पाठवून मोठा दिलदार पणा दाखवला. दरम्यान, आमदार महोदयांचे हे कृत्य म्हणजे जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार असल्याची चर्चा तालुक्यात रंगली आहे. तर, सोशल मीडियातूनही संताप व्यक्त होत आहे. दरम्यान, आमदार नामदेवराव ससाणे हे भाजप पक्षातून आमदार म्हणून निवडून आले आहेत.

Team Global News Marathi: