उद्धव ठाकरे लवकरच महाराष्ट्राचा दौरा करणार, दौऱ्याची तयारी सुरू;

 

मुंबई | शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे लवकरच महाराष्ट्राचा दौरा करणार आहेत. या दौऱ्याची तयारी सुरू झाली असल्याची माहिती शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी दिली आहे. आदित्य ठाकरे यांच्या शिवसंवाद यात्रेला सुरुवात झाली आहे. ठाण्यातून त्यांनी या यात्रेला सुरुवात केली. ठाणे जिल्ह्यात त्यांच्या शिवसंवाद यात्रेला प्रचंड प्रतिसाद मिळाला असून ते जिथे जात आहेत तिथे तरुण, सर्वसामान्य नागरीक, शिवसैनिकांचा त्यांना प्रचंड प्रतिसाद मिळतोय. शिवसेना जिंदाबादचे नारे लावले जात आहेत. आम्ही शिवसेनेसोबत अशा घोषणा दिल्या जात आहे असे राऊत यांनी म्हटले.

संजय राऊत यांनी सांगितले की, शिवसेना नेते आदित्य ठाकरे हे जवळपास महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत. गुरुवारी ठाणे जिल्ह्यातून त्यांच्या दौऱ्याची सुरुवात झाली. ठाण्यात त्यांचे उत्साहात स्वागत झाले. आदित्य यांच्या दौऱ्याला तरुणांचा चांगला प्रतिसाद लाभत असून स्थानिक शिवसैनिक शिवसेनेसोबत असल्याचे त्यांनी सांगितले. येत्या काही दिवसांत महाराष्ट्रातील वातावरण शिवसेनामय झालेलं असणार आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे राज्याच्या दौऱ्यावर जाणार असून त्याचे नियोजन सुरू झाले असल्याची माहिती संजय राऊत यांनी दिली.

आम्ही देशासमोर उभे असलेले प्रश्न विचारत आहोत. त्यामुळे सोनिया गांधी, राहुल गांधी यांच्यासह अनेकांना नोटिसा आल्या आहेत. देश हितासाठी बोलत असल्याने सर्वांवर कारवाई सुरू आहे. केंद्रीय तपास यंत्रणा कोणाच्या दबावात काम करत आहेत, हे आता स्पष्ट झाले आहे. विरोधकांचा आवाज दाबण्यासाठी केंद्रीय तपास यंत्रणांचा वापर सुरू असल्याचा आरोप राऊत यांनी केला.

‘शिवसेना खासदारांच्या नाराजीला विनायक राऊतच जबाबदार’

हिंदुत्वाचं प्रतीक हातात दिसलं नाही, तुम्ही भगवा सोडलाय का?

 

Team Global News Marathi: