उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदेंनी चर्चा केली तर मार्ग निघेल – दीपाली सय्यद

 

मुख्यमंत्री म्हणून अनपेक्षितपणे सगळ्यांना धक्का देत एकनाथ शिंदे यांची निवड झाली. देवेंद्र फडणवीस यांनीही उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. गेल्या २० दिवसांपासून मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री हे दोघं राज्याचा कारभार पाहत होते. मात्र रखडलेल्या मंत्रिमंडळ विस्तारावरून विरोधकांनी सातत्याने सत्ताधारी शिंदे-फडणवीस यांच्यावर हल्लाबोल केला.

 

शिंदे यांच्या बंडखोरीनंतर विधानसभेच्या उपाध्यक्षांनी शिवसेनेच्या १६ आमदारांना अपात्रतेची नोटीस बजावली. यात ४८ तासांची मुदत देण्यात आली होती. मात्र त्याआधीच शिंदे गटाने नोटिशीविरोधात सुप्रीम कोर्टात धाव घेतली. त्यानंतर या प्रकरणाची सुनावणी ११ जुलैला ठेवण्यात आली. याच दरम्यान आता शिवसेनेच्या नेत्या दीपाली सय्यद यांनी नवं ट्विट केलं आहे.

 

“आमदार खासदारांना शिवसेना पक्ष मागायला कोर्टात जाण्याची गरज लागणार नाही, उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदेंनी चर्चा केली तर मार्ग निघेल” असं दीपाली सय्यद यांनी म्हटलं आहे. आपल्या ट्विटर अकाऊंटवरून त्यांनी याबाबत एक ट्विट केलं आहे. दिली सय्यद यांच्या या ट्विटमुळे नव्या चर्चांना उधाण आले आहे.

त्या पुढे म्हणतायत की, “अजुनही वेळ गेलेली नाही, आमदार खासदारांना शिवसेना पक्ष मागायला कोर्टात जाण्याची गरज लागणार नाही, आदरणीय उद्धव साहेब आणि आदरणीय शिंदे साहेबांनी चर्चा केली तर मार्ग निघेल, याची जबाबदारी दोन्ही बाजुने झाली तर विजय शिवसेनेचाच होईल. जय महाराष्ट्र” असं दीपाली सय्यद यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे.

खासदार फोडणे शिंदे गटाला पडणार भारी, शिवसेना पुरावा घेऊन कोर्टात जाणार

तुमच्या मोबाईलमध्येही आहेत का हे धोकादायक अँप्स, लगेच डिलीट करा

 

Team Global News Marathi: