शिवसेनाप्रमुखांनी सामान्य माणसांना मोठे होण्याचा मार्ग दाखवला

 

शिवसेना प्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती निमित्त पक्षप्रमुख तथा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील तमाम शिवसैनिकांशी संवाद साधला होता. तसेच विविध मान्यवरांनी आपल्या भावना प्रकट केल्या होत्या. यावेळी शिवसेना नेते आणि उद्योगमंत्री सुभास देसाई यांनी सुद्धा जुन्या आठवणींना उजाळा दिला होता.

बाळासाहेब ठाकरे यांचा जन्मदिवस हा शिवसैनिकांसाठी नवीन ऊर्जा देणारा दिवस असतो. बाळासाहेबांना सुधारकांचा वारसा प्रबोधनकारांकडून मिळाला. ते राजकारणात, समाजकारणात व्यस्त असले तरीसुद्धा त्यांनी हा वारसा नजरेआड होऊ दिला नाही. शिवसैनिकांची एक निष्ठा आणि सेवा बघून त्यांना शिवसेनाप्रमुखांनी संधी दिली. म्हणून अत्यंत तळगाळातील सामान्य माणसांना संधी दिली आणि मोठे होण्याचा मार्ग दाखवला.

शिवसेनाप्रमुखांनी विकासाचा विचार राज्याला दिला. आज पुण्याच्या एक कोटींपर्यंतच्या लोकसंख्येचा विचार करून शिवसेनाप्रमुखांची देण असलेला मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे त्यांच्या दूरदृष्टीची जाणीव करून देतो, अशा शब्दांत शिवसेना नेते उद्योग मंत्री सुभाष देसाई यांनी शिवसेनाप्रमुखांच्या आठवणींना उजाळा दिला.

Team Global News Marathi: