उद्धव ठाकरे इतके लोकप्रिय की त्यांना पंतप्रधानही केले पाहिजे – पृथ्वीराज चव्हाण

 

पुणे | मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देशातील लोकप्रिय मुख्यमंत्र्यांच्या यादीत पहिले स्थान पटकावले आहे. प्रश्नम या संस्थेने देशातील १३ राज्यांच्या मुख्यमंत्र्यांच्या कामगिरीबाबत मतदारांकडे सर्वेक्षण केले होते. त्यावर प्रतिक्रिया देताना काँग्रेस नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी थेट उद्धव ठाकरेंना पंतप्रधान करण्याची मागणी केली आहे.

ते रविवारी पुण्यात पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी हे वक्तव्य केले आहे. उद्धव ठाकरे हे महाराष्ट्राचे इतके लोकप्रिय मुख्यमंत्री आहेत की, त्यांना पंतप्रधानसुद्धा केले पाहिजे. त्यांनी लोकाभिमुख प्रशासन दिले असून ते शक्य आहे. लोकांना केंद्रभागी ठेवून हे करता येते, अशी प्रतिक्रिया चव्हाण यांनी दिली आहे. मात्र त्यांच्या या विधानावर आता आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

यावेळी त्यांनी पंतप्रधान मोडवर सुद्धा निशाणा साधला होता. चार दिवस लसीकरण थांबवायचे आणि पाचव्या दिवशी रेकॉर्ड झाला म्हणून पाठ थोपटवून घ्यायची. यामुळे किती लोकांचे जीव चाललेत. मोदींच्या व त्यांच्या टीमच्या अकार्यक्षम कारभारामुळे किती जणांचे नाहक बळी गेलेत, याचा मला वाटतं कधीच निश्चित आकडा आपल्याला कळणार नाही. आज चार लाखांपेक्षा अधिक लोक मृत्युमुखी पडले आहेत. यापैकी मोदींच्या हलगर्जीपणामुळे किती जणांचा मृत्यू झाला? हे समजायला हवे, असे पृथ्वीराज चव्हाण यांनी बोलून दाखवले.

Team Global News Marathi: