उद्धव ठाकरे लॉकडाऊनबाबत देवेंद्र फडणवीसांशी खोटं बोलले, चंद्रकांत पाटलांची टीका

राज्यात वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर शनिवार आणि रविवार असा दोन दिवसाचा कुडाळ लॉक डाऊन जाहीर करण्यात आला आहे. या संदर्भात मुख्यमंत्र्यांनी मनसे प्रमुख राज ठाकरे आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्याशी सुद्धा चर्चा केली होती. मात्र आता या संदर्भात भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मुख्यमंत्र्यांवर आरोप लगावला आहे.

उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात केवळ शनिवार आणि रविवारच्या लॉकडाऊनसंदर्भात चर्चा झाली होती. मात्र, राज्य सरकारने पूर्ण लॉकडाऊनची अधिसूचना जारी केली. जनता ही फसवणूक खपवून घेणार नाही तसेच या संदर्भात चर्चा न झाल्याचे पाटील यांनी बोलून दाखविले आहे.

ते मंगळवारी भारतीय जनता पक्षाच्या स्थापनादिनानिमित्त पुण्यात आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात बोलत होते. यावेळी त्यांनी महाविकासआघाडी सरकार हे त्यांच्या कर्माने मरेल, अशा शब्दांत हल्लाबोल केला. पुढे बोलताना ते म्हणाले की, येत्या आठ दिवसांत ठाकरे सरकारमधील तिसऱ्या मंत्र्याला राजीनामा द्यावा लागेल, असा गर्भित इशाराही चंद्रकांत पाटील यांनी दिला. भाजप २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत स्वबळावर सत्तेत येईल, असा दावाही पाटील यांनी केला.

Team Global News Marathi: