“सत्ता पाडण्यासाठी प्रयत्न होत असतील, तर…” राज ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत उपस्थित केला प्रश्न

मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेना अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज पत्रकार परिषद आयोजित केली होते. कोरोना संसर्ग ते माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंहपर्यंत अनेक मुद्द्यांवर त्यांनी यावेळी भाष्य केले. यावेळी त्यांनी अनेक नवे खुलासे सुद्धा केले होते. मंत्र्यांनी जी कृत्य केली त्यामुळेच त्यांना राजीनामा द्यावा लागला आहे. यापुढे आणखी मंत्र्यांनी असं काही कृत्य केलं तर त्यांचाही राजीनामा होईल, सत्ता पाडण्यासाठी प्रयत्न होत असतील तर त्यांच्या मंत्र्यांनीही असं काही काम केलंय म्हणून त्यांना राजीनामा द्यावा लागत आहे. असं मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी सांगितले आहे.

पुढे बोलताना राज ठाकरे म्हणाले की, त्या मंत्र्यांकडून असं काही तरी कृत्य घडत आहे, त्यामुळे त्यांना राजीनामा द्यावा लागत आहे. सरकार पाडणे इतकं सोप्प आहे का? ती इमारत नाही. खालून पिलर काढले म्हणजे पडेल. परमबीर सिंग यांना १०० कोटींचा साक्षात्कार पदावरून काढल्यानंतर का झाला? त्यांना काढले नसते तर हे समोर आले नसते. त्यांचीही चौकशी झाली पाहिजे. बार आणि रेस्टोरंटकडून १०० कोटींचं टार्गेट अनिल देशमुखांकडून दिले गेले हा आरोप लांच्छनास्पद आहे. पोलीस बदल्यांचा बाजार होतोय हे काही नवीन नाही असं त्यांनी सांगितले.

अनिल देशमुख यांचा राजीनामा हा महत्त्वाचा विषय नाही. महत्त्वाचा विषय मुकेश अंबानींच्या घराबाहेर पोलिसांनी बॉम्बची गाडी ठेवली, त्याची चौकशी झालीय का? पोलिसांनी जी गाडी ठेवली ती कोणाच्या सांगण्यावरून ठेवली? कोणीतरी आदेश दिल्याशिवाय पोलीस हे कृत्य करणार नाही? जिलेटिन असलेली गाडी ठेवली कोणी? याची चौकशी झाली पाहिजे. उद्धव ठाकरेंच्या हातात राज्य आलंय? की त्यांच्यावर राज्य आलंय कळत नाही असा टोलाही राज ठाकरेंनी ठाकरे सरकारला लगावला आहे.

Team Global News Marathi: