“त्यावेळी आम्ही शिकवलेलं वाया गेलं नाही, केसरकर भारी प्रवक्ते झाले”

 

राहुल नार्वेकर यांची विधानसभेच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली असून विरोधकांना जोरदार धक्का बसला आहे. प्रस्तावाच्या बाजूनं १६४ मतं पडली. तर प्रस्तावाच्या विरोधात १०७ जणांनी मतदान केलं. तर ३ जण मतदानादरम्यान तटस्थ राहिले. यानंतर माजी उपमुख्यंत्री अजित पवरा यांनी अध्यक्षांचे आभार मानत सभागृहात तुफान फटकेबाजी केली.

“समोर बसलेल्यांनी यापूर्वी भिंती रंगवल्या, पोस्टर लावले, आंदोलनं केली, निष्ठावंत कार्यकर्ते म्हणून त्यांना ओळखतात. मी जेव्हा पाहतो तेव्हा मूळचे भाजपचे मान्यवर कमी आणि आमच्याकडून गेलेले मान्यवर जास्त पाहायला मिळतात. त्यांना पाहून मला मूळ भाजपच्या मान्यवरांचं वाईट वाटतं. पदांवर बसलेले मान्यवर मूळ मान्यवरांना सारून बाजूला बसले आहेत,” असं म्हणत अजित पवारांनी टोला लगावला.

पहिली लाईन पाहिली तरी तुम्हाला कल्पना येईल. गणेश नाईक, बबनराव पाचपुते, राधाकृष्ण विखे-पाटील, दीपक केसरकर. दीपक केसरकर तर आता काय चांगले प्रवक्ते झालेत. त्यावेळी आम्ही शिकवलेलं कुठे वाया गेलं नाही, असं म्हणत त्यांनी तुफान फटकेबाजी केली. यानंतर सभागृहात एकच हशा पिकला.

Team Global News Marathi: