‘त्या’ वक्तव्यामुळे नारायण राणे यांच्या विरोधात अब्रूनुकसानीचा दावा ‘या’ नेत्याने केला दाखल

 

मुंबई | केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी काही दिवसांपूर्वी उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत विरोधात वादग्रस्त विधान केले होते या वादग्रस्त विधान विरोधात खासदार संजय राऊत यांनी केंद्रीय मंत्री, भाजप नेते नारायण राणे यांच्याविरोधात अब्रूनुकसानीचा दावा दाखल केला आहे. संजय राऊत यांनी मुलुंड न्यायालयात नारायण राणे यांच्याविरोधात अब्रूनुकसानीचा दावा दाखल केला आहे.

प्रकरण असे की, भांडूप येथील एका कार्यक्रमामध्ये बोलताना नारायण राणे यांनी राऊतांबद्दल वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. या प्रकरणात आता संजय राऊत यांनी राणे यांच्याविरोधात अब्रूनुकसानीचा दावा दाखल केला आहे. फेब्रुवारीत पाठवली होती नोटीस संजय राऊत यांनी वादग्रस्त वक्तव्य प्रकरणात नारायण राणे यांना फेब्रुवारी महिन्यात कायदेशीर नोटीस पाठवली होती.

राणे यांनी पुराव्यानिशी त्यांचा दावा सिद्ध करावा असं या नोटीसीमध्ये राऊत यांनी म्हटलं होतं. मात्र नारायण राणे यांनी या नोटीसीला उत्तर न दिल्याने संजय राऊत यांनी अखेर नारायण राणे यांच्याविरोधात मानहानीचा दावा दाखल केला आहे. नेमकं काय म्हटलं होतं राणेंनी आपण शिवसेनेत असताना संजय राऊत यांना राज्यसभेवर निवडूण आणण्यासाठी मी खर्च केला होता. संजय राऊत यांचं मतदार यादीत नावही नव्हतं, असं वक्तव्य नारायण राणे यांनी केलं होतं.

दरम्यान या प्रकरणात संजय राऊत यांनी नारायण राणे यांना फेब्रुवारी महिन्यात कायदेशईर नोटीस पाठवली होती. राणे यांनी पुराव्यानिशी त्यांचा दावा सिद्ध करावा असं या नोटीसीमध्ये राऊत यांनी म्हटलं होतं. मात्र नारायण राणे यांनी या नोटीसीला उत्तर न दिल्याने संजय राऊत यांनी अखेर राणेंविरोधात मानहानीचा दावा दाखल केला आहे.

Team Global News Marathi: