त्या शब्दावरुन ट्रोल होताच भडकले आरोग्यमंत्री, थेट राजीनामा देण्याची दिली धमकी

 

आरोग्यमंत्री तानाजी सावंत चांगलेच चर्चेत आहेत. घर ते ऑफिस आणि ऑफिस ते घर या त्यांच्या दौऱ्याची बरीच चर्चा झाली होती. यानंतर आता आपल्या एका विधानामुळे ते पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. पुण्यातील ससून रुग्णालयात गेले असता वैद्यकीय अधिकाऱ्यांना झापताना ते म्हणाले , की ‘तुम्ही त्या हाफकीन माणसाकडून औषधं घेता ते आधी बंद करा’. हाफफीन माणूस आहे की संस्था याबद्दलची माहिती आरोग्यमंत्र्यांना नव्हती, असा उल्लेख एका बातमीच्या कात्रणात आला आहे. यानंतर आरोग्यमंत्री चांगलेच ट्रोल झाले आहेत. यावर प्रतिक्रिया देत तानाजी सावंत यांनी थेट मंत्रिपदाचा राजीनामा देण्याची तयारी दाखवली आहे.

तानाजी सावंत म्हणाले, की काही जणांना शिंदे सरकार आलेलं रुचत नाही. माध्यमांनी माझं शिक्षण बघावं, सोलापूरमध्ये शिक्षण झालं, त्यावेळेस मी टॉपचा विद्यार्थी होतो. माझं शिक्षण डिग्रीपासून पीएचडीपर्यंत झालं आहे. हाफकीन या माणसाकडून औषधं घेऊ नका, असं म्हणायला मी मूर्ख आहे का?

असा सवाल त्यांनी केला. पुढे ते म्हणाले, की एकदा माझ्या प्रोफाईलवर जाऊन बघावं. किती संस्था, किती कारखाने त्यात किती स्टाफ आहे ते पाहावं. तुम्हाला मी अंगठा बहादूर मंत्री आहे असं वाटतं का? असा सवालही त्यांनी केला. पुढे ते म्हणाले, की हाफकीन या विषयावर मी बोललो असेल तर आत्ता मंत्रिपदाचा राजीनामा लिहून देतो.

Team Global News Marathi: