येरवडा कारागृहातून दोन कोरोना पॉझिटिव्ह कैदी पळाले

येरवडा कारागृहातून दोन कोरोना पॉझिटिव्ह कैदी पळाले

पुणे – येरवडा येथील तात्पुरत्या कारागृहातून कैदी पळून जाण्याचे सत्र सुरुच आहे. या कारागृहातून पुन्हा एकदा दोन कैद्यांनी धूम ठोकली आहे. विशेष म्हणजे हे दोन्ही कैदी कोरोना पॉझिटिव्ह आहेत. त्यामुळे पोलीस प्रशासनाची झोप उडाली आहे. दोन्ही कैद्यांचा युद्धपातळीवर शोध सुरु आहे.

अनिल विठ्ठल वेताळ (वय २१, रा- गणेश नगर, भीमा कोरेगाव, ता-शिरूर, जि- पुणे) आणि विशाल रामधन खरात (घर नं ५, फातिमा मशिदीसमोर श्री समर्थ हौसिंग सोसायटी, निगडी, पुणे) असे पळून गेलेल्या कैद्यांचे नाव आहे.

अभिनेत्या पाठोपाठ आणखी एका अभिनेत्रीने गळफास लावून केली आत्महत्या

वेताळ आणि खरात हे गंभीर गुन्ह्यातील आरोपी आहेत. ते सध्या न्यायालयीन कोठडीत होते. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर त्यांना तात्पुरत्या कारागृहाच्या इमारत क्रमांक १०४ मधील पहिल्या मजल्यावरील रुम नंबर 1 मध्ये ठेवण्यात आले होते. संधीचा फायदा घेत त्यांनी येथून पळ काढला.

रिक्षा चालकाचा दिलदारपणा ! प्रवाशांची विसरलेली ११ तोळे सोने, २० हजार रोकड असलेली बॅग केली परत

दोन्ही कैदी हे कोरोना पॉझिटिव्ह आहेत. पोलिसांकडून त्यांचा शोध घेतला जात आहे. यापूर्वीही तात्पुरत्या कारागृहातून कैदी पळून गेले होते. यातील काहींना नंतर पुन्हा अटक करण्यात आली होती.

ग्लोबल न्युज नेटवर्क: