कंगना प्रकरणात राज्यपाल केंद्राकडे राज्य सरकार विरोधात अहवाल पाठवणार

कंगना प्रकरणात राज्यपाल केंद्राकडे राज्य सरकार विरोधात अहवाल पाठवणार

सिनेअभिनेत्री कंगना रानौत आणि शिवसेना पक्षात सुरु असलेल्या वादात आता राज्याचे राज्यपाल भगत सिंग कोश्यारी यांनी उडी मारली आहे. काल महानगर पालिकेने कंगनाच्या अनधिकृत बांधकाम असलेल्या पाली हिल कार्यालयावर बुलडोझर चालवला होता. याविरोधात कंगनाने मुख्यमंत्री ठाकरे यांच्यावर टीका केली होती.

आता या प्रकरणात खुद्द राज्यपाल कोश्यारी यांनी मध्यस्थी घेत मुख्यमंत्र्यांचे प्रधान सल्लागार अजॉय मेहता यांच्याकडे या कारवाहीबाबत नाराजी व्यक्त केली आहे. सुशांत सिह राजपूत प्रकरण, अंतिम वर्षाच्या परीक्षा या सर्व निर्णयात राज्यपाल कोश्यारी यांनी राज्य सरकारच्या विरोधात भूमिका घेतलेली आहे. तसे ताशोरे सुद्धा सरकारवर ओढले आहे.

कंगनाच्या कार्यालयावर महापालिकेकडून करण्यात आलेल्या कारवाईबाबत राज्यपालांनी नाराजी व्यक्त केली आहे. मुख्यमंत्र्यांचे प्रधान सल्लागार अजॉय मेहता यांच्याकडे या कारवाईबाबत राज्यपालांनी नाराजी व्यक्त केली आहे. अजॉय मेहता यांना राजभवनात बोलवून भगतसिंह कोश्यारी यांनी नापसंती दर्शवली. कोश्यारी या वादाबाबत केंद्र सरकारकडे अहवाल देण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

रिक्षा चालकाचा दिलदारपणा ! प्रवाशांची विसरलेली ११ तोळे सोने, २० हजार रोकड असलेली बॅग केली परत

महानगरपालिकेच्या कारवाईवर महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत की जर तेथे बेकायदा बांधकाम असेल तर कारवाई केलीच पाहिजे. कोणीतरी तुमच्याविरूद्ध बोलले, म्हणून जर तुम्ही कारवाई केली तर ती भ्याडपणा आहे, सूडबुद्धीची भावना आहे आणि महाराष्ट्रात या प्रकाराबद्दल आदर असू शकत नाही. त्याचवेळी कंगना रनौत यांनी शिवसेनेविरोधात मोर्चा उघडला आहे. येणार्‍या काळात ही बाब आणखी तीव्र होऊ शकेल.

अभिनेत्या पाठोपाठ आणखी एका अभिनेत्रीने गळफास लावून केली आत्महत्या

ग्लोबल न्युज नेटवर्क: