बारावी परीक्षेच्या वेळापत्रकात बदल, ५ मार्चचा पेपर आता होणार ५ एप्रिलला

 

मुंबई | राज्यातील बारावीच्या परीक्षेला येत्या ४ मार्चपासून सुरुवात होणार आहे, मात्र बारावीच्या परीक्षांच्या वेळापत्रकात अंशतः बदल झाला आहे. ५ मार्चला होणारा हिंदीचा पेपर आता ५ एप्रिलला तर ७ मार्चला होणारा मराठीचा पेपर आता ७ एप्रिलला होणार आहे. दोनच दिवसांपूर्वी संगमनेर येथे बारावीच्या प्रश्नपत्रिका घेऊन जाणाऱया टेम्पोला आग लागली आहे त्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे.

मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी दिलेल्या माहितीनुसार या वर्षी मंडळाची परीक्षा ४ मार्चपासून सुरू होणार आहे. ४ मार्चला इंग्रजीचा पेपर वेळापत्रकाप्रमाणेच होईल. परंतु ५ आणि ७ मार्चचा दुसऱया आणि तिसऱया भाषा विषयाची परीक्षा होती. बुधवारी पुणे विभागाकडे येणारा प्रश्नपत्रिकांचा टेम्पो जळून खाक झाला आहे. त्यात ५ आणि ७ मार्चच्या पेपरच्या प्रश्नपत्रिका होत्या. त्यामुळे या दोन्ही दिवसांच्या परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय सर्वानुमते झाला आहे.

जळालेल्या ट्रकमध्ये मराठी, हिंदीसह २५ प्रकारच्या भाषा विषयांच्या प्रश्नपत्रिका होत्या. त्या प्रश्नपत्रिका आता ओपन झाल्या आहेत. हा ट्रक फक्त पुणे विभागाचा असला तरी अन्य आठ विभागांनाही प्रश्नपत्रिकांचा पुरवठा झाला होता. त्यामुळे आता राज्यभरातील प्रश्नपत्रिका बदलाव्या लागणार आहेत

Team Global News Marathi: