शिवसैनिकाची ऐनवेळी मास्कमुळे तारांबळ, व्हिडिओ होतोय व्हायरल

 

नवी दिल्ली | उत्तर प्रदेशात विधानसभा निवडणुकीचे वारे वाहताना दिसत आहेत. यंदाच्या उत्तर प्रदेश निवडणुकीच्या रिंगणात शिवसेना पुर्ण ताकदीने उतरलेली पाहायला मिळत आहे. पर्यटन मंत्री तथा युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे, बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे, खासदार धैर्यशील माने व अनेक शिवसेना नेते जोरदार प्रचार करताना दिसत आहेत.

उत्तर प्रदेशातील शिवसेनेच्या जाहीर सभेचा एक व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे. खासदार धैर्यशील माने यांच्या जोरदार भाषणावेळी मागे थांबलेल्या एका शिवसैनिकाला मास्कच घालता येत नव्हता. त्या शिवसेना पदाधिकाऱ्याला प्रयत्न करूनही मास्क लावता येत नव्हता. सतत मास्क लावण्याचा तो प्रयत्न करत असल्याचा हा मजेशीर व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

जवळपास दोन मिनिटे शिवसेना पदाधिकाऱ्याने मास्क लावण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्या शिवसैनिकाला मास्कची रचनाच लक्षात येत नव्हती. बराच प्रयत्न करूनही मास्क लावता येत नसल्याने शेवटी समोरच्या व्यक्तीकडून मास्कबद्दल समजून घेतलं आणि मास्क लावला. या घटनेचा संपूर्ण व्हिडीओ कॅमेऱ्यात कैद झाला आहे. मात्र दुसरीकडे नेटकऱ्यांनी या व्हिडिओवरून सेनेला ट्रोल केले आहे.

Team Global News Marathi: