‘ट्विट करणाऱ्यांचे संस्कार महाराष्ट्राला कळले’, चाकणकर यांचा टोला

 

काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्ष रूपाली चाकणकर यांची राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदी निवड केली जाऊ शकते, अशा चर्चा सुरू झाल्या होत्या. यावरून त्यांच्यावर सर्व स्थरातून शुभेच्छांचा वर्षाव होत असताना त्यावर भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी देखील टीका करताना रुपाली चाकणकर यांचा उल्लेख शूर्पणखा असा करत जोरदार टोला लगावला होता.

चाकणकर विरुद्ध वाघ असा वाद नेहमीच काही ना काही कारणाने रंगत असल्याचं पाहायला मिळत असतं. त्यातच चित्रा वाघ यांनी केलेल्या टीकेवर रुपाली चाकणकर यांनी देखील आता स्पष्टीकरण दिलं आहे. राज्यात अनेक महत्वाचे प्रश्न प्रलंबित असताना या क्षुल्लक गोष्टींना फारसं महत्त्व देणे गरजेचे वाटत नसल्याचं रुपाली चाकणकर यांनी म्हटलं आहे.

रुपाली चाकणकर यांना अध्यक्षपदाबाबत कोणतीही पूर्वकल्पना किंवा विचारणा करण्यात आलेली नसून पक्षातर्फेही कोणतीही कल्पना देण्यात आली नसल्याचे त्यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना स्पष्ट केलं आहे. तसेच ट्विट करणार यांचे संस्कार महाराष्ट्राला समजले असे देखील प्रत्युत्तर त्यांनी चित्रा वाघ यांना दिलं आहे. आता या टीकेला वाघ काय प्रतिउत्तर देतायत हे पाहावे लागणार आहे.

Team Global News Marathi: