टीव्ही, इलेक्ट्रिक वाहनं स्वस्त तर या वस्तूंच्या किमती वाढणार

 

देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारमण 2023-24 या आर्थिक वर्षासाठी अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पावर सर्व सामान्य जनतेच्या नजर खिळलेल्या असताही मोबाईल फोन टीव्ही, इलेक्ट्रिक वाहनं स्वस्त झाली आहेत तर चांदीचे दागिने, चांदीची भांडी महाग झाली आहेत.

2024 च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी मोदी सरकारचा हा शेवटचा पूर्ण अर्थसंकल्प आहे. अशा परिस्थितीत अर्थसंकल्पातून दिलासा मिळेल, अशी अपेक्षा आहे. अर्थसंकल्पातील घोषणांसह वेळी, कोणत्या वस्तू महाग होतील, कोणत्या वस्तूंच्या किंमती कमी होतील, याचीही लोकांमध्ये उत्सुकता होती.

दरम्यान अर्थसंकल्पीय भाषणाची सुरुवात करताना निर्मला सीतारमण म्हणाल्या की, “जगाने भारतीय अर्थव्यवस्थेला एक चमकता तारा मानले आहे. जगात भारताचा मान वाढला आहे. भारतीय अर्थव्यवस्था योग्य दिशेने वाटचाल करत आहे आणि उज्ज्वल भविष्याकडे वाटचाल करत आहे. त्या म्हणाले की, कोरोनाच्या काळात कोणीही उपाशी झोपणार नाही याची आम्ही काळजी घेतली. सरकारने 2 लाख कोटी रुपये खर्च करून प्रत्येक व्यक्तीला अन्नधान्य दिले. 80 कोटी लोकांना 28 महिन्यांसाठी मोफत रेशनची व्यवस्था करण्यात आली.”

काय स्वस्त होणार?
मोबाईल, टीव्ही आणि टीव्हीचे सुटे भाग, इलेक्ट्रिक वाहने, खेळणी, कॅमेरा लेन्स,सिगरेट

काय महाग?
सोने-चांदी दागिने महागणार, विदेशी किचन चिमणी, चांदीचे दागिने, चांदीची भांडी

Team Global News Marathi: