…तरीदेखील भाजपच्या पोपटलालची पोपटपंची सुरूच, संजय राऊतांच्या सोमय्यांवर निशाणा

 

उद्धव ठाकरे गटाचे नेते आणि परिवहन मंत्री अनिल परब यांचे मुंबईतील जनसंपर्क कार्यालय तोडण्यात आले. त्यावरून भाजप नेते किरीट सोमय्या यांनी परब यांचे कार्यालय अनधिकृत असल्याचा दावा केला. त्यामुळे किरीट सोमय्या आणि परब यांच्यात चांगलच शाब्दिक चकमक सुरु झाली होती. तर दुसरीकडे म्हाडाच्या अधिकाऱ्यांना जाब विचारण्यासाठी ठाकरे गटाचे शिवसैनिक म्हाडा कार्यालयात घुसले होते. जिथे त्यांनी मोठा गोंधळ घातला. त्यावर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी प्रतिकिया दिली आहे.

राऊत म्हणाले की “आमच्यावर खोटे गुन्हे नोंदवले जात असतील तर आम्ही खरे गुन्हे घ्यायला तयार आहोत. अनिल परब यांच्या कार्यालयावर हतोडा टाकण्यात आला. ते कार्यालय परब यांचे नसल्याचे म्हाडाने सांगितले आहे. तरीदेखील भारतीय जनता पक्षाचा पोपटलाल वारंवार आरोप करतो. शिवसेना यापुढे राडा करणार असून या बदनामीच्या मोहिमांना आम्ही थांबवणार आहोत.” असे ते म्हणाले.

“भाजप पुरस्कृत उद्योगपतीने देशाला खड्ड्यात घातले आहे. हा आर्थिक गैरव्यवहाराचा प्रकार असल्यामुळे हिम्मत असेल तर यावर बोला. शेकडो शेल कंपन्यांच्या माध्यमातून देशातील अर्थव्यवस्था उद्ध्वस्त करण्यात आली आहे. त्यावर पोपटलाल का बोलत नाहीत. शिवसेनेने केलेल्या राड्याचे मी स्वागत करतो. खोट्या कारवाया केल्या जात असतील तर आम्ही कायदेशीर लढाई लढू. मी स्वत: किरीट सोमय्या तसेच नारायण राणे यांना कायदेशीर नोटीस पाठवली आहे. आमच्यावर केलेले आरोप कोर्टात सिद्ध करावे लागतील.” असे ते म्हणाले.

Team Global News Marathi: