‘तुझ्यात जीव रंगला’ फेम अभिनेत्री कल्याणी कुरळेचा कोल्हापूर सांगली महामार्गावर डंपरच्या धडकेत ठार

 

मराठी टिव्हि क्षेत्रातून अत्यंत धक्कादायक आणि दुख:द बातमी समोर आली आहे. लोकप्रिय अभिनेत्री कल्याणी कुरुळे जाधव हिचा अपघातात मृत्यू झालेला आहे. कोल्हापूरमधील हालोंडी सांगली फाटा इथं एका डंपरच्या धडकेत तिचा मृत्यू झालेला आहे. कल्याणीने ‘तुझ्यात जीव रंगला’ या मालिकेसह अनेक मालिकांमधून अभिनयाचा ठसा उमठवला होता.

 

कल्याणीने काही दिवसांपूर्वीच ‘प्रेमाची भाकरी’ नावाचे हाॅटेल सुरु केले होते. यावेळी हाॅटेल बंद करून बाहेर पडत असतानाच डंपरने धडक दिल्याने मृत्यू झाला. कोल्हापूर सांगली महामार्ग पूर्णत: खड्ड्यात गेल्याने मृत्यूचाच सापळा झाला आहे. महामार्गावर पडलेल्या खड्ड्यांनी आतापर्यंत निष्पाप जीवांचा बळी गेला आहे. अनेक ठिकाणी रस्ताच उखडल्याने पॅचवर्कची ठिगळं काय कामाची? अशी परिस्थिती आहे.

कल्याणी मराठी टिव्ही जगतातील एक उभरती अभिनेत्री होती. अनेक मालिकांमध्ये तिने अभिनय केला होता. तुझ्यात जिव रंगला या मालिकेतुन ती लोकप्रिय झाली होती. कलाक्षेत्रात आपलं नाव करु पाहणारी एक अभिनेत्री कल्याणीच्या अशा अचानक जाण्याने मराठी मनोरंजन सृष्टिवर शोककळा पसरली आहे आजवर विविध संघटनांकडूनही या रस्त्यासाठी आंदोलने करण्यात आली आहेत.

Team Global News Marathi: