तुरुंगातून सुटल्यापेक्षा अमोल किर्तीकर सोबत राहिलाचा जास्त आनंद

 

अमोल किर्तीकर यांनी शिवसेना खासदार संजय राऊत यांची आज भेट घेतली. गजानन किर्तीकर यांनी शिंदे गटात प्रवेश केला, पण अमोल किर्तीकर यांनी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेची निवड केल्याने राऊतांनी आनंद व्यक्त केला आहे. राऊतांनी यावेळी म्हटलं आहे की, 100 दिवस तुरुंगात राहून सुटका झाल्यावर जेवढा आनंद झाला नाही, त्यापेक्षाही अधिक आनंद अमोल किर्तीकरांच्या शिवसेनेत राहण्याचा झाला आहे.

अमोल आज भेटायला आले, त्यांनी वडील गजानन यांना समजावण्याचा प्रयत्न केला आणि शिवसेनेतच राहण्याचा निर्णय घेतला, याचा आनंद तुरुंगातून सुटका होण्यापेक्षा अधिक आहे, असं राऊतांनी म्हटलं आहे. आजवर अमोल किर्तीकर हे आदित्य ठाकरे यांच्या आतापर्यंतच्या राजकीय प्रवासात सोबत असलेले कडवट शिवसैनिक आहेत आणि ते शिवसेनेबरोबरच आहेत.

वडील गजानन किर्तीकरांच्या निर्णयामध्ये अमोल सहभागी नाहीत. अमोल किर्तीकर मूळ शिवसेनेसोबत आहेत. याचा आम्हांला सर्वांना आनंद आहे. अमोल किर्तीकर यांनी राऊतांची भेट घेतल्यानंतर दोघांनीही एकत्रपणे माध्यमांना प्रतिक्रिया दिली. गजानन कीर्तिकर यांनी बाळासाहेबांची शिवसेना पक्षात प्रवेश घेत उद्धव ठाकरे यांची साथ सोडली आहे. पण त्यांचा मुलगा अमोल कीर्तिकर मात्र उद्धव ठाकरे यांच्यासोबतच शिवसेना ( उद्धव बाळासाहेब ठाकरे ) पक्षातच आहेत. याबाबत अमोल किर्तीकर ठाकरे गटात असण्यावर राऊतांनी आनंद व्यक्त केला आहे

Team Global News Marathi: