‘तुझा हिशेब २०२२लाच करून टाकला’; निलेश राणेंची राऊतांवर टीका

आयएनएस विक्रांत युद्धनौका आर्थिक गैरव्यवहारप्रकरणात भारतीय जनता पक्षाचे नेते आणि माजी खासदारकिरीट सोमय्या आणि मुलगा नील सोमय्या यांना मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने क्लीन चिट दिली आहे. या प्रकरणात कोणताही ठोस पुरावा सापडला नाही, अशी कबुली मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने न्यायालयात दिली आहे.

आता यावरून उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी थेट सरकार बदलेल तेव्हा संपूर्ण हिशेब चुकता करू, असा इशारा दिला होता. मात्र त्यांच्या या इशाऱ्यावर भाजपचे नेते निलेश राणे यांनी बोचरी टीका केली आहे. यासोबतच पवार कुटुंबियांनाही लक्ष्य केले आहे. निलेश राणे यांनी ट्विट करत संजय राऊतांवर बोचरी टीका केली.

संजय राऊत म्हणतात, २०२४मध्ये हिशेब चुकता करू. मात्र आम्ही संजय राऊतांचा २०२२मध्येच हिशेब चुकता केला, अशी बोचरी टीका त्यांनी केली. तसेच दुसऱ्या ट्विटमध्ये त्यांनी पवार कुटुंबावरही निशाणा साधला. मराठी माणूस, हिंदू धर्म, हिंदू संस्कृती हे शब्द आता कुठे पवार कुटुंबाच्या तोंडातून बाहेर पडू लागले. तुमच्यासारखे नाटकी तुम्हीच, असे म्हणत त्यांनी पवार कुटुंबियांना लक्ष्य केले.

Team Global News Marathi: