आघाडीच्या मोर्च्याला परवानगी; फडणवीस म्हणाले, ‘मोर्चा शांततेत काढावा नाहीतर

 

राज्यापाल भगतसिंह कोश्यारी आणि भाजप नेत्यांकडून महापुरूषांबाबत केलेले वादग्रस्त विधाने. कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांकडून महाराष्ट्रातील काही भागावर केलेल्या दाव्याविरोधात उद्या महाविकास आघाडीकडून मुंबईत महामोर्चा काढला जाणार आहे. मात्र त्याला परवानगी मिळालेली नव्हती. मात्र आता या महामोर्च्याला परवानगी देण्यात आल्याची माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

मोर्चाला परवानगी दिली आहे. लोकशाही मार्गाने प्रत्येकाला मत मांडण्याचा अधिकार आहे. त्यांचा मार्ग ठरलेला आहे. त्यांनी कायदा सुव्यवस्था राखली जावी, अशी आमची अपेक्षा आहे. तसेच विरोधकांच्या प्रत्येक प्रश्नाला उत्तर द्यावे असे नाही, असेही फडणवीस म्हणाले.

नाशिकमधील ठाकरे गटाच्या माजी नगरसेवकांनी शिंदे गटात प्रवेश केला. त्यावर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी या माजी नगरसेवकांना दलाल असल्याचे म्हटले होते. यावर फडणवीस म्हणाले, संजय राऊतांना कुणी सिरीयसली घेत नाही. त्यांच्यासोबत होते तेव्हा चांगले आणि त्यांच्या विरोधात गेले की दलाल ही भाषा चुकीची आहे, असे फडणवीस म्हणाले.

दरम्यान, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुंबई- गोवा महामार्गाबाबत भेट घेतली. केंद्रीय नितीन गडकरी यांच्याशी देखील याबाबत चर्चा केली जाणार आहे. तसेच मंत्रिमंडळ विस्ताराबाबत योग्य वेळी माहिती देऊ, अशी माहिती यावेळी फडणवीस यांनी दिली.

Team Global News Marathi: