बंडातात्या यांना ताब्यात घेतल्यानंतर तुषार भोसलेंचा ठाकरे सरकारला इशारा

 

कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने यंदाच्या वर्षी सुद्धा वारीवर काही निर्बंध लादलेले असताना पायी वारीवर ठाम असलेल्या बंडातात्या कराडकर यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. पिंपरी-चिंचवड शहरातील दिघी पोलिसांनी आज पहाटे त्यांना ताब्यात घेत वडमुखवाडी चरहोली येथे स्थानबद्ध करण्यात आले आहे.

पायी वारी साठी परवानगी द्यावी, अशी मागणी बंडातात्या यांनी केली होती. मात्र कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने पायी वारीला परवानगी नाकारली. मात्र पायी वारी करणारच, अशी ठाम भूमिका घेत शनिवारी पहाटे काही वारकऱ्यांनी पायी वारी सुरू केली. त्यावेळी पोलिसांनी त्या वारकऱ्यांसह बंडातात्या कराडकर यांना ताब्यात घेतले. पायी वारी करू नये असे समजावून सांगण्याचा पोलिसांकडून प्रयत्न करण्यात आला.

बंडातात्या कराडकर यांना पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर भारतीय जनता पक्षाच्या आध्यात्मिक आघाडीचे प्रदेश सहसंयोजक आचार्य तुषार भोसले यांनी राज्य सरकारवर घणाघाती टीका आहे. मुघलांपेक्षा ठाकरे सरकार अत्याचारी आहे. बंडातात्यांना अटक करायला लाज कशी वाटली नाही. आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी परिणाम भोगायला आता तयार रहावं, असा इशारा देखील तुषार भोसले यांना दिला आहे.

Team Global News Marathi: