अमूल पाठोपाठ आता गोकुळ दुधाच्या किमती सुद्धा वाढणार, आज होणार संचालकांची बैठक |

 

कोल्हापूर | पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या किमतीच्या पार्श्वभूमीवर अमूलने आपल्या दुधाच्या किमती वाढवल्या होत्या. आता त्या पाठोपाठ गोकुळ दूध संघाने सुद्धा आपल्या दुधाच्या किमती वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. आज गोकुळ दूध संघाच्या संचालक मंडळाची महत्वाची बैठक होणारे आहे. या बैठकीत दरवाढीवर शिक्कामोर्तब होणारे आहे.

एकीकडे पेट्रोल, डिझेल, गॅस महागले आहेत. त्यात आता दुधाचे दरही वाढणार असल्यामुळे सर्वसामान्य ग्राहकांच्या खिशाला मोठा फटका बसणारे आहे. आवश्यक असलेल्या वस्तूंवर सतत होत असलेल्या दर वाढीमुळे नागरिकांच्या महिन्याचं गणित चूकत आहे.

१ जुलैपासून अमूल दूध देशभरात दोन रुपयांनी महाग झाले आहे. गुजरात, दिल्ली-एनसीआर, पश्चिम बंगाल आणि महाराष्ट्रासह अन्य राज्यांत नवीन दर लागू करण्यात आले असल्याचे कंपनीने म्हटले आहे. कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर अन्न पदार्थांच्या किंमती वाढवल्यानंतर अमूलने आता दुधाच्या किंमती वाढविल्या आहेत.

त्यामुळे गोकुळ दुधाबरोबर पनीर, लोणी, तूप, ताक, लस्सी, आईस्क्रीमच्या किंमतीही वाढू शकतात. त्यामुळे आज होणाऱ्या बैठकीत गोकुळ दुधाचे दर किती रूपयांनी वाढतात आणि नवे दर कधीपासून लागू होतात. या निर्णयाकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

Team Global News Marathi: