‘तुम्ही तुमची इज्जत घालवली तेवढी पुरे, निघा आता’ काँग्रेसने एकनाथ शिंदेंना सुनावले

 

शिवसेना नेते आणि मंत्री एकनाथ शिंदे गेल्या तीन दिवसांपासून शिवसेनेच्या आमदारांना घेऊन आसाममधील गुवाहाटीमध्ये मुक्कामी आहे. आधीच आसाममध्ये पूरपरिस्थिती आहे, त्यामुळे एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्र सरकार अडचणीत आणलं आहे, पण आमचे राज्य नका अडचणीत आणू नका, निघा आता, असा सणसणीत टोला आसामच्या काँग्रेसने लगावला आहे.

शिवसेनेचे एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेचे ३३ आमदार फोडून सुरत व्हाया गुवाहाटी गाठले आहे. मागील पाच दिवसांपासून हे बंडखोरांचे नाट्य सुरू आहे. गुवाहाटीमधील ‘रॅडिसन ब्लू’ हॉटेलमध्ये एकनाथ शिंदे आणि सेनेचे आमदार तळ ठोकून आहे. खुद्द आसामधील भाजपचे नेते एकनाथ शिंदे यांच्या भेटीगाठी घेत असल्यामुळे पूर्ण मदत करत असल्याचे समोर आले आहे. भाजपच्या या भूमिकेवरून काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष भूपेन कुमार बोरा यांनी एकनाथ शिंदे यांना पत्र लिहून खडेबोल सुनावले आहे.

महाराष्ट्र अडचणीत आणलाच शिंदेजी,आता आसामसुद्धा अडचणीत आणू नका. पूरपीडित लोकांना मदत देण्यापेक्षा आपल्या सरबराई मध्ये आमचं सरकार व्यस्त आहे,हे महाराष्ट्राला शोभत नाही. तुम्ही तुमची घालवली तेवढी इज्जत पुरे आहे. निघा आता’अशी टीका आसाम काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष भूपेन कुमार बोरा यांनी लगावला आहे. एकनाथ शिंदे हे आधी गुजरातमधील सुरतमध्ये मुक्कामी होते. पण, महाराष्ट्रापासून अंतर जवळ असल्यामुळे दुसऱ्याच दिवशी भल्या पहाटे एकनाथ शिंदे हे सर्व आमदारांना घेऊन गुवाहाटीला रवाना झाले होते.

यावेळी भाजपचे नेते सुद्धा सोबत असल्याचे समोर आले होते. त्यामुळे भाजप एकनाथ शिंदेंच्या बंडाला पाठिंबा असल्याचे समोर आले आहे. दरम्यान, दुसरीकडे, शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या दैनिक सामनामधून एकनाथ शिंदे यांच्या बंडावर टीका करण्यात आली आहे. सुरतच्या ‘मेरिडिअन’ हॉटेलमध्ये अर्धवट राहिलेले ‘चिंतन’ कार्य अखेर ईशान्येकडील गुवाहाटी शहरात मार्गी लागले.

Team Global News Marathi: