तुम्ही म्हणता की तुम्ही शिवसेनेत आहात, पत्रकाराच्या प्रश्नावर शिंदे म्हणतायत की,

राज्यात महाविकास आघाडीचं सरकार कोसळलं आणि शिंदे सरकार स्थापन झालं. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबतचे एकूण ५० आमदार आणि भाजपानं एकत्र येत राज्यात सत्ता स्थापन केली. त्यानंतर आमच्या व्हिपचं उल्लंघन करणार, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं.

विधानसभेत बहुमत सिद्ध करताना आमच्या व्हिपचं उल्लंघन करणाऱ्या आमदारांवर कारवाई करणार असल्याचा इशारा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिला आहे. खरी शिवसेना आम्ही आहोत. त्यामुळे नियमांचं उल्लंघन करणाऱ्या आमदारांवर कारवाई करणार असल्याचं एकनाथ शिंदे यांनी सांगितलं.

एकनाथ शिंदे आणि त्यांच्या गटातील सर्व बंडखोर आमदार सुरुवातीपासूनच आम्ही शिवसेनेत आहोत. शिवसेना पक्ष सोडलेला नाही. आम्हीच खरी शिवसेना आहोत, असा दावा करत आहे. याचपार्श्वभूमीवर बीबीसी मराठी या वृत्तवाहिनीने एकनाथ शिंदे यांना प्रश्न विचारला.

शिंदेना विचारले की, तुम्ही म्हणता की तुम्ही शिवसेनेत आहात, उद्धव ठाकरे म्हणताहेत की ते शिवसेनाप्रमुख आहे. तुमच्या शिवसेनेचे प्रमुख कोण आहेत?, असं एकनाथ शिंदे यांना विचारलं. त्यावर असं आमचं काहीच म्हणणं नाही. लोकशाहीत बहुमताला मान असतो. ते आमच्याकडे आहे, असं उत्तर एकनाथ शिंदे यांनी दिलं.

Team Global News Marathi: