‘तुम्हाला उद्धव ठाकरेंनीच गुवाहाटीला पाठवलंय का?’ शिंदे म्हणतायत की,

 

भाजपसोबत महाराष्ट्रात सत्ता स्थापन करणार असल्याचे स्पष्ट संकेत शिवसेनेचे बंडखोर नेते, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी गुरुवारी दिले. त्यामुळे भाजपा-शिंदे युतीचे सरकार राज्यात स्थापन करण्याच्या हालचाली एक-दोन दिवसात गतिमान होतील, असे मानले जात आहे. शिवसेनेकडून १२ आमदारांची आमदारकी रद्द करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. यावर एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

शिंदे म्हणाले की, निलंबन करण्याचा अधिकारच नाही. कारण आमच्याकडे संख्याबळ जास्त आहे आणि ते संख्याबळ सिद्ध करुन दाखवण्याची आमची ताकद आहे, असं एकनाथ शिंदे म्हणाले. बैठकीला उपस्थित राहिलो नाही, म्हणून तुम्ही आमदारकी रद्द करण्याची मागणी करताय..असं कधी होतं का?, बैठकीला उपस्थित न राहिल्यामुळे म्हणून आमदारांचं निलंबन केलं जावं, असं देशात कोणतंही उदाहरण नाही. तसेच संख्याबळ सिद्ध करुन दाखवण्याची आमची ताकद आहे, असा दावा एकनाथ शिंदेंनी केला.

एकनाथ शिंदेंच्या बंडामागे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचाच हात असल्याचे सांगण्यात येत आहे. सध्या जे काही सुरु आहे, ती शिवसेनेचीच खेळी आहे. उद्धव ठाकरे यांनीत एकनाथ शिंदेंसह इतर आमदारांना गुवाहाटीला पाठवल्याची चर्चाही रंगली आहे, असा सवाल माध्यमांनी विचारला, त्यावर मला या चर्चांबाबत काही माहिती नाही, असं एकनाथ शिंदेंनी उत्तर दिलं.

Team Global News Marathi: