मोठी बातमी | शिंदे सोबत असलेल्या आमदारांच्या पीए, कॉन्स्टेबलवर कारवाई

 

 

 

शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी करत आमदारांसह गुवाहाटी गाठलं. मात्र याबाबत प्रशासनाला माहिती मिळू शकली नव्हती. त्यामुळं आता एकनाथ शिंदे यांच्यासोबत बंड केलेल्या जवळपास 40 आमदारांच्या पर्सनल सेक्रेटरी ऑफिसर, कमांडो आणि कॉन्स्टेबल यांच्यावर कारवाई होणार असल्याची माहिती आहे. पोलिसांना याबाबत कुणकुणही लागली नाही, याबाबत शरद पवारांनी नाराजी व्यक्त केली होती.

राज्य सरकार या सर्व अधिकाऱ्यांवर कारवाई करणार आहे. या सर्व आमदारांनी बंड केल्यानंतर महाराष्ट्राची हद्द सोडत असताना या सर्व अधिकाऱ्यांनी प्रशासनाला आणि गुप्तचर विभागाला माहिती न दिल्याने या सर्वांवर कारवाईचे आदेश देण्यात आल्याची माहिती आहे. राज्यातील सर्व जिल्हाधिकार्‍यांना त्या त्या जिल्ह्यातील आमदारांच्या या अधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्याचे आदेश देण्यात आले असल्याची देखील माहिती आहे.

 

एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी करण्याची तयारी मागील 6 महिन्यांपासून सुरु असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली होती. शिवाय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाच ते सहा वेळा गृहखात्याकडून शिंदे यांच्या भाजप नेत्यांशी वाढत्या भेटींबाबत आणि संशयास्पद हालचालींची माहिती देण्यात आली होती, अशी देखील माहिती आहे. इंटेलिजन्सचां रिपोर्ट मिळून देखील मुख्यमंत्र्यांकडून दुर्लक्ष झाल्याने ही परिस्थिती निर्माण झाल्याची माहिती समोर येत आहे.

 

 

Team Global News Marathi: