तुम्हाला माहिती आहे का? वजन कमी करण्यासोबत इम्युनिटीही वाढवतात मुरमुरे

 

मुंबई | चमचमीत खाण्यामध्ये सर्वात पहिली असते ती म्हणजे भेळ. ही भेळ मुरमुऱ्यांपासून अर्थात चिरमुऱ्यांपासून बनवली जाते. मुरमुऱ्यांपासून भेळीप्रमाणेच दहीपुरी, गोड चिक्की, लाडू हेदेखील बनवले जातात आणि लोक चवीने ते खातातही. मात्र तुम्हाला या मुरमुऱ्यांचे फायदे माहित आहेत का? मुरमुरे केवळ चवीसाठीच नाही तर आरोग्य उत्तम ठेवण्यातही खूप मदत करतात. शरीरात ऊर्जा टिकवून ठेवते मुरमुऱ्यांमध्ये प्रोटीन, ऊर्जा, कार्बोहायड्रेट, लोह, पोटॅशियम, नियासिन, थायामिन आणि रिबोफ्लेविन यांसारखे इतर अनेक पोषक घटक असतात.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, मुरमुऱ्यांचे सेवन केल्याने शरीरातील ऊर्जेची पातळी वाढते . कारण यामध्ये कार्बोहायड्रेट भरपूर असते. आपले शरीर कार्बोहायड्रेट्सचे ग्लुकोजमध्ये रूपांतर करते जे उर्जेचा मुख्य स्त्रोत आहे. मुरमुरे शरीरातील 60 ते 70% ऊर्जेची गरज भागवण्यास मदत करू शकतात.

पचनसंस्था सुरळीत काम करते मुरमुरे खाल्ल्याने पचनक्रिया सुरळीत राहते आणि बद्धकोष्ठतेची समस्या दूर होते. कारण यामध्ये भरपूर प्रमाणात फायबर असते. जे पचनक्रिया योग्य ठेवण्यास मदत करते. वजन नियंत्रित राहते मुरमुऱ्यामध्ये कॅलरीजचे प्रमाण खूपच कमी असते.

त्यामुळे याच्या सेवनाने वजन नियंत्रित राहण्यास मदत होते. यासोबतच यामध्ये भरपूर डायटरी फायबर देखील असते. ज्यामुळे ते खाल्ल्यानंतर पोट बराच वेळ भरलेले राहते आणि भूक कमी लागते. रोगप्रतिकारशक्ती वाढवते मुरमुऱ्यामध्ये भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन, मिनरल्स आणि फायटोकेमिकल्स असतात. जे रोगप्रतिकारशक्ती सुधारण्यास मदत करतात तसेच याच्या सेवनाने रोगप्रतिकारशक्ती वाढते

Team Global News Marathi: