तुम्हाला होणारा त्रास कमी झाला का?’ राम कदमांचा हर्षवर्धन पाटलांना टोला

‘भाजपमध्ये आल्यापासून सुखाची झोप लागते, कसलंच टेन्शन नाही!’ हे हर्षवर्धन पाटील यांचं विधान चांगलंच गाजलं होतं. आता त्याच विधानावरून भाजप नेते राम शिंदे यांनी चिमटा घेतला. ‘हर्षवर्धन पाटीलसाहेब, तुमचा त्रास आता कमी झालाय का?नसेल झाला तर आपण आपल्याकडील ‘पाना’ने आपण टाईट करू’, असं भाजप नेते राम शिंदे म्हणताच हर्षवर्धन पाटील गालात हसले. यावेळी सभेला उपस्थित लोकांमध्येही हशा पिकला.

भाजपने निवडणुकांची तयारी आतापासूनच सुरू केली आहे. त्यासाठी विविध केंद्रीय मंत्र्यांवर आणि भाजप नेत्यांवर देशातल्या लोकसभा मतदारसंघाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. त्याच दृष्टीनं बारामती लोकसभा मतदारसंघाची जबाबदारी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्यावर देण्यात आलेली असून निर्मला सीतारामन 22 सप्टेंबर ते 24 सप्टेंबर दरम्यान बारामती लोकसभा मतदारसंघाच्या दौऱ्यावर असतील. बारामतीचे प्रभारी म्हणून राम शिंदे यांच्यावर विशेष जबाबदारी देण्यात आली आहे. सीतारामन यांच्या दौऱ्याच्या तयारीकरिता इंदापुरात राम शिंदे, हर्षवर्धन पाटील, वासुदेव काळे यांच्या प्रमुख उपस्थितीत बैठक पार पडली. यावेळी राम शिंदे यांनी वरील विधान करत हर्षवर्धन पाटलांना चिमटा घेतला.

केंद्रीय मंत्री निर्मला सीतारामन यांच्या दौऱ्याच्या पूर्वतयारीचा आढावा घेण्यासाठी भाजपचे बारामती लोकसभेचे प्रभारी राम शिंदे यांनी इंदापूरमध्ये बैठक घेतली. यावेळी उपस्थित नेतेमंडळींनी भाषणं केली. इतकंच नाही तर राम शिंदे यांनी सुप्रिया सुळे यांना हरविण्याचा निर्धार बोलून दाखवला. सुप्रिया सुळे यांनी आता दुसरा ‘वायनाड’ शोधावा, अशीही भाषाही यावेळी त्यांनी वापरली.

Team Global News Marathi: