तुंबलेल्या मोरीतून भाजपचं गांडूळ निघालं; राज ठाकरेंच्या भाषणावर पेंडणेकरांचा हल्लाबोल

 

मुंबई : राज्यात आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आतापासून वातावरण तापलं आहे. गेल्या दोन वर्षांच्या प्रतीक्षेनंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा गुढीपाडवा मेळावा शनिवारी शिवाजीपार्क येथे झाला.या मेळाव्यात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, शरद पवार, अजित पवार, काँग्रेसवर सडकून टीका केली.

राज ठाकरे यांच्या टीकेला राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, गृहराज्यमंत्री जितेंद्र आव्हाड यांनी प्रत्युत्तर दिले आहे. शिवसेनेच्या नेत्या, माजी महापैार किशोरी पेडणेकर यांनी राज ठाकरेच्या भाषणावर सडकून टीका केली आहे.

पेडणेकर म्हणाल्या, ”राज ठाकरेंचे काल भाषण भाजपने लिहून दिले होतं. आम्हालाही लोकं विचारतात ‘लाव रे तो व्हिडिओ,” शिवसेनेचा द्वेष करण्यासाठी स्वतःचा पक्ष काढला का असा प्रश्न निर्माण होतो. कालच्या त्यांच्या भाषणाबाबत बऱ्याच मनसैनिकांनी आम्हाला सांगितलं की मोरी तुंबली आहे वाटलं, काही तरी निघेल पण भाजपचं गांडूळ निघालं”

‘बाळासाहेब ठाकरेंनी अनेकांना घडवलं त्यातले हे एक आहेत. भाजप त्यांना मांडीवर ही घेत नाहीत, खांद्यावरही घेत नाही. मुंबईत शिवसेनेचा द्वेष करून कोणीही मोठे झाले नाहीत. घरच्यांचा ही इतका द्वेष? असा सवाल पेडणेकर यांनी उपस्थित केला.

”मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे काम आपण पाहिलं आहे. आम्ही कामाचा विकासाचा धडाका लावला, कोविड कमी होताच आम्ही लोकापर्णाची कामं सुरु केली आहेत. बाळासाहेबांचा उत्तराधिकारी उद्धव ठाकरेंच आहेत हे पुन्हा एकदा सिद्ध झालं बाकी डुप्लिकेट लोकांचं काम नाही. ज्या पक्षात उद्धवजी युतीत होते त्यात काय घडलं हे सगळ्यांना माहित आहे. जर राज ठाकरे यांनी ठाकरे म्हणून उद्धवजींशी नाळ जोडली असती तर आज सगळं ठीक असतं,” असे पेडणेकर म्हणाल्या.

Team Global News Marathi: