ठाण्यामध्ये जैन समाजाच्या वतीनं कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमाला महाराष्ट्र नवनिर्माण सेने प्रमुख राज ठाकरे हे देखील उपस्थित होते. राज ठाकरे यांचं भव्य असं स्वागत जैन समाजाकडून करण्यात आलं. तसेच राज ठाकरे सभा मंडपात असल्यानं जैन समुदायाकडून जय महाराष्ट्र हे गाणं देखील लावण्यात आलं.
यावेळी जैन धर्मगुरूंनी राज ठाकरे यांच्याशी संवाद साधला. यावेळी बोलताना तुमच्यामध्ये मला बाळासाहेब दिसतात असं जैन धर्मगुरू यांनी म्हटलं. नेमकं काय म्हटलं धर्मगुरूंनी? ठाण्यामध्ये जैन समाजाच्या वतीनं कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमाला मनसेप्रमुख राज ठाकरे हे देखील उपस्थित होते. या कार्यक्रमामध्ये जैन धर्मगुरूंनी राज ठाकरे यांच्याशी संवाद साधला
‘मला तुमच्यामध्ये बाळासाहेब दिसतात, आम्हाला अखंड भारत हवा आहे, काश्मीरसोबतच पाकिस्तान पण पाहिजे, हे फक्त तुम्हीच करू शकता. बाळासाहेबांनी जी भूमिका घेतली ती भूमिका तुम्ही घ्या, आम्हाला तुमच्याकडून मोठ्या अपेक्षा आहेत’ असं जैन धर्मगुरू यांनी यावेळी बोलताना म्हटलं आहे.