परिवहन मंत्री अनिल परब यांच्या शासकीय बंगल्यावर संप फोडण्यासाठी बैठक !

 

एसटी परिवहन महामंडळाचे राज्य सरकारमध्ये विलीनीकरण करावे या मागणीसाठी मागच्या अनेक दिवसांपासून एसटी कर्मचारी आनेदोलन करत असून अद्याप कर्मचारी आपल्या मागण्यांवर ठाम आहेत. तसेच एसटीची सार्वजनिक प्रवासी सेवा बंद असल्याने संपकर्त्यांना कामावर रुजू होण्याचे आवाहन राज्य सरकारकडून करण्यात आले आहे.

दैनंदिन तोटा वाढत आहे. एसटी कर्मचाऱ्यांच्या संपावर टोकाची भूमिका घेण्याचा प्रयत्न सुरू आहे. संप फोडण्यासाठी परिवहन मंत्री अनिल परब यांच्या शासकीय बंगल्यावर बैठकांचे सत्र सुरू असून, रात्री उशिरा झालेल्या गुप्त बैठकीत एसटीचे वरिष्ठ अधिकारी होते. त्यानुसार मंगळवार पासून पहिल्या टप्यात पुणे, नाशिक, मुंबई सुरू करण्याचा प्रयत्न एसटीच्या अधिकाऱ्यांनी सुरू केले आहे.

ज्याप्रमाणे एसटीचे आगार हळूहळू बंद पडले त्याप्रमाणेच पुण्यातून हा संप फोडण्याची तयारी आता सरकारने सुरू केली आहे. विविध कएमचारी संघटनांच्या नेत्यांना आणि अधिकाऱ्यांना त्यांचा पदाधिकाऱ्यांशी बोलून कारवाई न करण्याच्या अटीवर कामावर रुजू होण्याचे आवाहन केले जात आहे. त्यासाठी मुंबई सेंट्रल मुख्यालयातील अधिकारी पुणे, नाशिक विभागात जाऊन मंगळवारी बैठकी घेतल्या आहे.

तसेच कर्नाटक, तेलंगणा राज्यातील संप आणि विलीनीकरणाच्या मागणीवर कर्नाटका, तेलंगणा सरकारने घेतलेल्या भूमीका आणि कर्मचाऱ्यांच्या वेतनश्रेणी बद्दल अभ्यास करण्यासाठी एसटी महामंडळातील लेखा शाखेतील अधिकारी कर्मचाऱ्यांना त्या-त्या राज्यात अभ्यास दौऱ्यावर पाठवण्यात आले आहे.

Team Global News Marathi: