अर्णब गोस्वामी विरोधात परिवहन मंत्री अनिल परब आणि आमदार सरनाईक आक्रमक

अर्णब गोस्वामी विरोधात परिवहन मंत्री अनिल परब आणि आमदार सरनाईक आक्रमक

ग्लोबल न्यूज:मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा एकेरी उल्लेख केल्या प्रकरणी शिवसेना नेते आक्रमक झालेले दिसून येत आहे. पावसाळी अधिवेशनात सुद्धा अर्णब विरोधात शिवसेने नेते आक्रमक होत त्याच्यावर हल्ला चढवला होता. मुख्यमंत्र्यांचा एकेरी उल्लेख केल्याप्रकरणी त्याच्यावर शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांच्याकडून हक्कभंगाचा प्रस्ताव आणण्यात आला.

“अर्णब गोस्वामी हेतुपुरस्सर आणि दुष्ट बुद्धीने वाईट बोलत आहेत. अभिनेता सुशांत सिंह राजपूत याच्या मृत्यू प्रकरणाशी नेत्यांचा काहीही संबंध नाही. मात्र गोस्वामी कपोलकल्पित बोलून स्वातंत्र्याच्या नावाखाली दिशाभूल करत आहेत. त्यांची ‘रिपब्लिक टीव्ही’ ही वृत्तवाहिनी बंद करण्यात यावी” अशी मागणी सभागृहात आमदार प्रताप सरनाईक यांनी केली होती.

पहिल्याच आठवडय़ात राज्य पोलीस दलातील १,६५७ जण करोना बाधीत

तर अर्णब गोस्वामी स्वतःला नायाधीश समजत आहे, स्वतः खटला चालवत आहे. स्वतः निकाल देत आहे” अशा शब्दात परिवहन मंत्री अनिल परब यांनी अर्णबवर हल्लाबोल केला. डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेल्या राज्यघटनेनुसार प्रसारमाध्यमांनीही कायदयाच्या चौकटीत राहून काम करायचे असते. या सर्व चौकटी सुसंगत राहाव्यात.

कंगनाने मुंबई पोलिसांची माफी मागावी, अन्यथा ५० कोटींचा दावा ठोकू

मात्र अर्णब स्वतःला न्यायाधीश समजतात का? हे कोण पत्रकार आहेत, ते सुपारी घेऊन काम करतात, असा अपमान करणाऱ्या पत्रकाराला शिक्षा झाली पाहिजे. एक घटना घडली तर पत्रकार संरक्षण कायदा आणला, म्हणून त्यांनी काहीही करायचं का?” असा प्रश्न अनिल परब यांनी उपस्थित केला.

ग्लोबल न्युज नेटवर्क: