“आजच्या बैठकीवर मी निराश, अधिवेशनाचा कालावधी वाढवावा”

डिसेंबर महिन्यात राज्य सरकारचे हिवाळी अधिवेशन पार पडणार आहे. यासाठी विरोधकांनी सरकारला घेरायला कंबर कसली आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस बिजझेन अॅडव्हायजरीच्या बैठकीत उपस्थित होते.
यावेळी त्यांनी राज्य सरकारवर टीका केली. कामकाजाचे पाच दिवस ठरवण्यात आले आहेत. त्यातील पहिला दिवस शोकसभेत जातो. त्यामुळे चार दिवसांच्या अधिवेशनात काय होणार, असा प्रश्न फडणवीसांनी उपस्थित केला.

अधिवेशनाचा कालावधी वाढवावा असं ते म्हणाले. ३१ डिसेंबरला लोक बाहेर जातात, असं राज्य सरकारने उत्तर दिलं. मात्र, तीन दिवसांचा ब्रेक घेऊन त्यानंतर उर्वरित अधिवेशन पूर्ण करण्याची विरोधकांची मागणी सरकारने धूडकावून लावली. त्यामुळे अधिवेशन घेण्याच्या तयारीत सरकार नसल्याचं स्पष्ट होतं. असा आरोप फडणवीसांनी केला.

दोन वर्षांमध्ये साध्या अतारांकित प्रश्नालाही उत्तर देण्यात आलेलं नाही. त्या प्रश्नांवर लक्ष्य दिल्यास महत्वाचे विषय निकाली निघू शकतात. अनेक गोष्टींवर अकुश राहतो. पण सरकारने हे नकेल्याने मी नाराजी व्यक्त केल्याचं फडणवीस म्हणाले. सगळी आयुधं गोठवून टाकण्याचं काम सरकारने केलं आहे. हे सरकार अधिवशनाच्या विरोधात असल्याची भूमिका भाजप नेत्यांनी मांडली.

Team Global News Marathi: