कंगणा पुन्हा प्रेमात? बड्या नेत्याच्या नावाची होत आहे सर्वत्र चर्चा

 

मुंबई | आपल्या वादग्रस्त विधानावरून सतत चर्चेत राहणारी अभिनेत्री कंगणा रनौत पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. मात्र, यावेळी तीने कुठलंही वादग्रस्त विधान न करता ती यावेळी तिच्या इन्स्टाग्राम पोस्टवरून चर्चेत आली आहे. कंगणाने इन्टाग्रामवर 1 रोमँटीक पोस्ट केली आहे. ज्यामध्ये ती एका व्यक्तीच्या प्रेमात असल्याची चर्चा सोशल मीडियावर रंगली आहे.

कंगणाने इन्स्टाग्रामवर केलेल्या पोस्टमध्ये तिने एक ॲनिमेटेड फोटो शेअर करत त्याखाली ‘तेरे लिए हम है जिए. कितने सितम हमपे सनम’ असं कॅप्शन दिलं आहे. तिच्या या पोस्टमुळे सोशल मीडियावर एकच चर्चा रंगली आहे. कंगणाने नेमकी ही पोस्ट कोणासाठी केली आहे ? ती कोणासोबत रिलेशनशीपमध्ये आहे का? असे प्रश्न सध्या नेटकरी विचारत आहेत.

कंगणा ही यापूर्वी ऋतिक रोशन सोबत रिलेशन मध्ये होती. मात्र, त्यानंतर त्यांच्यामध्ये वाद झाल्याने ते वेगळे झाले. त्यावेळीही कंगणा आणि ऋतिक यांच्यातील वाद चव्हाट्यावर आला होता. कंगणाने त्यावेळी ऋतिक रोशनवर अनेक गंभीर आरोप केले होते. त्यानंतर आता कंगणा पुन्हा एकदा एका बड्या नेत्याच्या प्रेमात असल्याची चर्चा सध्या सुरु आहे.

Team Global News Marathi: