राशिभविष्य : जाणून घ्या कसा असेल आजचा दिवस तुमच्याराशीसाठी

आजचे पंचांग – वार शनिवार, दि. 18.06.2022 (Todays Horoscope 18 June 2022)

शुभाशुभ विचार- 14.00 नंतर चांगला दिवस.

आज विशेष – साधारण दिवस.

राहू काळ – सकाळी 09.00 ते 10.30.

दिशा शूल – पूर्वेस असेल.

आजचे नक्षत्र – श्रवण 07.39 पर्यंत नंतर धनिष्ठा.

चंद्र राशी – मकर 18.43 पर्यंत नंतर कुंभ.

—————————————————–

आजचे राशीभविष्य – (Todays Horoscope 18 June 2022 )

मेष – (शुभ रंग – सोनेरी)

धंद्यातील येणी वसूल झाल्याने नवीन व्यावसायिकांच्या मनावरील दडपण कमी होईल. कार्यक्षेत्रात स्वतःचे महत्त्व निर्माण कराल. आज तुम्ही हार्डवर्क करण्यापेक्षा स्मार्टवर्क करण्यास प्राधान्य द्याल.

वृषभ – (शुभ रंग- राखाडी)

आज अति आक्रमकता नुकसानास कारणीभूत होईल. विरोधकांना चहा पाजूनच आपला कार्यभाग साधून घेणे हिताचे राहील. शारीरिक स्वास्थ्य उत्तम असल्याने प्रत्येक कामात उत्साह राहील.

मिथुन – (शुभ रंग- डाळिंबी)

आज जोखमीची कामे टाळलेलीच बरी. जे काही कराल ते तब्येतीस जपूनच करा. हातचे सोडून पळत्याच्या मागे अजिबात धावू नका व कायद्याची चौकट मोडू नका.

कर्क – (शुभ रंग – स्ट्रॉबेरी)

आज तुम्ही अगदी सहज घेतलेले निर्णय ही योग्य ठरतील. व्यवसायातील स्पर्धकांना ही तुमचा हेवा वाटेल. आज पत्नी योग्य सल्ले देणार आहे. विद्यार्थ्यांना सुयश.

सिंह – (शुभ रंग- गुलाबी )

कार्यक्षेत्रात सावधगिरीने पावले टाकणे गरजेचे आहे. नवीन ओळखीत डोळे झाकून विश्वास ठेवणे योग्य ठरणार नाही. तुमच्यातील सकारात्मकता इतरांना प्रभावित करेल.

कन्या – (शुभ रंग पांढरा)

तरुणांनी मौज मजा करताना कायद्याचे भान ठेवावे. बेफिकीर पणास लगाम गरजेचा आहे. व्यसने घात करतील. कला क्षेत्रातील मंडळींना मेहनतीचे फळ मिळेल.

आज स्थावर, शेतीवाडी संबंधित व्यवहार फायद्याचे ठरतील. कलाकारांना मात्र रिकाम्या खुर्च्या बघाव्या लागतील. गृहिणी गप्पांमधून गैरसमज पसरवतील.

वृश्चिक – (शुभ रंग- मोरपिशी)

भावनेच्या भरात कोणाला वचने देऊ नका. कितीही चांगले संबंध असले तरी कुणाला जामीन राहू नका. आज लहान भावाला तुमच्या मदतीची गरज भासेल.

धनु – (शुभ रंग – जांभळा)

रिकाम्या चर्चेतून वाद होतील. जोडीदार जे म्हणेल त्यास हो म्हणालात तर वैवाहिक जीवनात गोडीगुलाबी राहील. नवविवाहितांना बाळाच्या आगमनाची चाहूल लागेल.

मकर – (शुभ रंग- नारिंगी)

आज प्रत्येक कामात विलंब ठरलेलाच आहे. व्यवसायात वाढत्या स्पर्धेला तोंड देण्यासाठी कामाचे तास वाढवावे लागतील. मन हळवे करणारा एखादा प्रसंग घडेल.

कुंभ – (शुभ रंग- मरून)

अनाठायी खर्चाचे प्रमाण वाढेल. प्रवासात दगदग होईल. बेरोजगारांनी घरापासून लांब जायची तयारी ठेवायला हवी. एखाद्या सुरक्षित आर्थिक गुंतवणुकीचा विचार कराल.

मीन – (शुभ रंग – चंदेरी)

आज आपला स्वार्थ साधून घेण्यासाठी मोठ्या लोकांच्या ओळखी वापराल. मित्रही आज दिलेले शब्द पाळतील. एखादी मोठी रक्कम हाती येण्याची शक्यता आहे.

!! शुभम भवतु!!

श्री जयंत कुलकर्णी.
फोन – 9689165424
( ज्योतिषी व वास्तू सल्लागार)

ग्लोबल न्युज नेटवर्क: