राशिभविष्य : जाणून घ्या कसा असेल आजचा दिवस तुमच्याराशीसाठी

मेष- आज चंद्र धनु राशीस स्थित राहील. आपल्यासाठी चंद्र भाग्यात स्थानी असेल. आज आपण एखाद्या अडचणीत सापडू शकता. नोकरीत इतरांशी प्रेमाने वागून कार्य पूर्ण करून घ्या. वाद संभवतात. नशिबाची साथ मिळणार नाही. कामात त्वरित यश मिळणार नाही. दुपार नंतर परिस्थितीत सुधारणा होईल.

वृषभ- आज चंद्र धनु राशीस स्थित राहील. आपल्यासाठी चंद्र अष्टमात स्थानी असेल. आज आपण हळवे व्हाल व त्यामुळे आपणास बेचैनी जाणवेल. शारीरिक स्वास्थ्यावर सुद्धा त्याचा नकारात्मक परिणाम होईल. नवे कार्य आज सुरू करू नका. उक्ती व कृतीवर नियंत्रण ठेवा.

मिथुन- आज चंद्र धनु राशीस स्थित राहील. आपल्यासाठी चंद्र सातवा स्थानी असेल. आजचा दिवस आनंददायी आहे. आज आपली मनःस्थिती मनोरंजनात्मक कार्यात सहभागी होण्याची असल्याने मित्रांसह एखाद्या सहलीस जाऊ शकाल. रुचकर भोजन व उंची वस्त्रालंकार लाभतील.

कर्क- आज चंद्र धनु राशीस स्थित राहील. आपल्यासाठी चंद्र सहावा स्थानी असेल. आज व्यावसायिक वातावरण आपणास अनुकूल राहील. स्त्रियांना माहेरहून आनंददायी बातमी मिळेल. प्रतिस्पर्ध्यांवर मात कराल. शारीरिक व मानसिक स्वास्थ्य चांगले राहील.

सिंह- आज चंद्र धनु राशीस स्थित राहील. आपल्यासाठी चंद्र पाचवा स्थानी असेल. आजचा दिवस प्रणयाराधनेसाठी अनुकूल आहे. रागावर नियंत्रण ठेवा. पोटाच्या व्याधी त्रास देतील. दुपारनंतर घरात आनंद- उत्साहाचे वातावरण राहील. मानसिक प्रसन्नता व उत्साह जाणवेल. व्यवसायात लाभ संभवतो.

कन्या- आज चंद्र धनु राशीस स्थित राहील. आपल्यासाठी चंद्र चवथा स्थानी असेल. आज शारीरिक स्वास्थ्य, मानसिक तरतरी व चेतना शक्तीचा अभाव राहील. सामाजिक स्तरावर मानहानी संभवते. धनहानी सुद्धा संभवते. रागावर नियंत्रण ठेवा. कार्य साफल्य न झाल्याने निराश व्हाल.

तूळ- आज चंद्र धनु राशीस स्थित राहील. आपल्यासाठी चंद्र तिसरा स्थानी असेल. आजचा दिवस नवे कार्य हाती घेण्यास अनुकूल आहे. प्रिय व्यक्तीच्या भेटीने आनंद होईल. भाग्योदय होईल. समाजात मान- सन्मान मिळतील. दुपार नंतर मात्र मन उदास होईल. शारीरिक अस्वास्थ्य जाणवेल.

वृश्चिक- आज चंद्र धनु राशीस स्थित राहील. आपल्यासाठी चंद्र दुसरा स्थानी असेल. नियोजित काम पूर्ण न झाल्याने नैराश्य येईल. कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे आज टाळावे. घरगुती वातावरण क्लेशदायी राहील. दुपार नंतर भावंडांसह आनंदात वेळ घालवाल. प्रतिस्पर्ध्यांना पराभूत कराल.

धनु- आज चंद्र धनु राशीस स्थित राहील. आपल्यासाठी चंद्र प्रथम स्थानी असेल. आजचा दिवस शुभ फलदायी आहे. नियोजित कामे पूर्ण होऊन धनप्राप्ती होईल. शारीरिक व मानसिक दृष्टया उत्साहित व ताजेतवाने राहाल. प्रत्येक काम उत्साहाने कराल. प्रवास संभवतो. दुपार नंतर मात्र द्विधा मनःस्थिती होईल.

मकर- आज चंद्र धनु राशीस स्थित राहील. आपल्यासाठी चंद्र बारावा स्थानी असेल. आज आपल्या बोलण्या वागण्याने भांडण होण्याची शक्यता असल्याने त्यावर नियंत्रण ठेवावे लागेल. संतापाचे प्रमाण वाढेल. मन चिंतीत राहील. मनःशांती मिळविण्याचा प्रयत्न करा. दुपार नंतर स्फूर्ती व उत्साह वाढेल.

कुंभ- आज चंद्र धनु राशीस स्थित राहील. आपल्यासाठी चंद्र लाभात स्थानी असेल. आजचा दिवस सर्व दृष्टींनी लाभदायी आहे. सामाजिक क्षेत्रात आपण सक्रीय राहाल व त्याच्या फल स्वरूप आपली सामाजिक प्रतिष्ठा वाढेल. विवाहेच्छुकांचे विवाह ठरू शकल्याने त्यांच्या आनंदात भर पडेल.

मीन- आज चंद्र धनु राशीस स्थित राहील. आपल्यासाठी चंद्र दशमात स्थानी असेल. आजचा दिवस आपणास सर्व दृष्टींनी लाभदायी आहे. हातून परोपकारी कार्य घडेल. व्यापारात सुयोग्य नियोजनामुळे व्यापार वृद्धी करू शकाल. नोकरीत वरिष्ठ आपल्या कामाचे कौतुक करतील.

ग्लोबल न्युज नेटवर्क: