आजचे राशिभविष्य: जाणून घ्या कसा असेल आजचा रविवार आपल्यासाठी

 

ग्लोबल न्यूज; रविवार 11 एप्रिल रोजी उत्तर भाद्रपद नक्षत्रामध्ये सूर्योदय होत आहे. यासोबतच आजची ग्रहस्थिती ऐंद्र नावाचा शुभ योग तयार करत आहे. या शुभ योगाचा फायदा 12 पैकी 7 राशीच्या लोकांना जास्त प्रमाणात होईल. शुभ योगाच्या प्रभावाने करिअरमध्ये पुढे जाण्याची संधी मिळेल. नशिबाची साथ मिळू शकते. पैशाशी संबंधित अडचणी नष्ट होऊ शकतात. या व्यतिरिक्त इतर पाच राशीच्या लोकांसाठी दिवस संमिश्र फळ देणारा राहील.

मेष

नवे डावपेच टाकता येतील

मेषेच्या पराक्रमात मंगळ, स्वराशीत सूर्य-बुध राश्यांतर होत आहे. रविवारी, सोमवारी अडचणी येतील. गुढीपाडव्याच्या दिवशी नव्या कार्याचा आरंभ कराल. राजकीय, सामाजिक क्षेत्रांत नव्या पद्धतीचे डावपेच टाकता येतील. बुद्धिचातुर्य, अविरत मेहनत या स्तंभावर तुमचे यशाचे तोरण झळकणार आहे.

शुभ दिनांक :13, 17

 

वृषभ

प्रसिद्धीचा हव्यास दूर ठेवा

वृषभेच्या धनेशात मंगळ, व्ययेशात सूर्य-बुध राश्यांतर होत आहे. कोणतेही काम करताना अतिशयोक्ती करू नका. राजकीय, सामाजिक क्षेत्रांत परिस्थितीचे अवलोकन करा. प्रसिद्धीचा हव्यास न करता काम करा. नोकरीत वरिष्ठांना कमी लेखू नका. जवळच्या व्यक्तीच्या भावना समजून घ्या.

शुभ दिनांक :16, 17

 

मिथुन

नव्या कार्याचा आरंभ करा

स्वराशीत मंगळ, मिथुनेच्या एकादशात सूर्य-बुध राश्यांतर होत आहे. संधी थोडय़ा काळासाठी असते. वेळेला महत्त्व द्या. नव्या कार्याचा आरंभ करा. राजकीय, सामाजिक क्षेत्रांतील गैरसमज दूर करा. अर्धवट राहिलेली कामे पूर्ण करा. प्रतिष्ठा व लोकप्रियता वाढेल. चित्रपट, कला, क्रीडा क्षेत्रात प्रसिद्धी मिळेल.

शुभ दिनांक :13, 14

 

कर्क

नोकरीत प्रभाव वाढेल

कर्केच्या व्ययेशात मंगळ, कर्केच्या दशमेशात सूर्य-बुध राश्यांतर होत आहे. गुढीपाडव्याच्या दिवशी आत्मविश्वास वाढवणारी घटना घडेल. राजकीय, सामाजिक क्षेत्रांत तुमच्या कामाचे कौतुक होईल. मत व्यक्त करताना सावध रहा. नोकरीत प्रभाव वाढेल. कौटुंबिक वाटाघाटीसाठी पुढाकार घ्यावा लागेल.

शुभ दिनांक :13, 14

 

सिंह

शुभ समाचार मिळतील

सिंहेच्या एकादशात मंगळ, भाग्येशात रवी-बुध राश्यांतर होत आहे. तुमच्या कार्यातील सर्व अडचणी सोडवता येतील. गुढीपाडव्याच्या दिवशी शुभ समाचार मिळेल. राजकीय, सामाजिक क्षेत्रांतील आरोप दूर सारता येतील. उज्ज्वल यशाचा झेंडा रोवता येईल. प्रेरणा देणारी घटना घडेल.

शुभ दिनांक :13, 14

 

कन्या

मतभेद होतील

कन्येच्या दशमेशात मंगळ, अष्टमेशात सूर्य-बुध राश्यांतर होत आहे. अहंकाराची भावना ठेवू नका. घेतलेला निर्णय वादग्रस्त, मनस्ताप देणारा ठरू शकतो. घरातील व्यक्तींमध्ये मतभेद होतील. व्यवहारात फसगत टाळा. राजकीय, सामाजिक क्षेत्रांत जुने अनुभव उपयुक्त ठरतील. कायद्याच्या कचाटय़ात अडकू नका.

शुभ दिनांक :16, 17

 

तूळ

रागावर ताबा ठेवा

तुळेच्या भाग्येशात मंगळ, सप्तमेशात सूर्य-बुध राश्यांतर होत आहे. आठवडय़ाची सुरुवात ताणतणावाने होईल. रागावर ताबा ठेवा. गुढीपाडव्याच्या दिवशी महत्त्वाचा निर्णय घेता येईल. राजकीय, सामाजिक क्षेत्रांत तुमचे महत्त्व नव्याने निदर्शनास येईल. कायद्याच्या कक्षा ओलांडू नका.

शुभ दिनांक :13, 14

 

वृश्चिक

सतर्क रहा

वृश्चिकेच्या अष्टमेशात मंगळ, षष्ठेशात सूर्य-बुध राश्यांतर होत आहे. तुमचा गैरफायदा घेतला जाईल अशी परिस्थिती निर्माण होईल. दूरदृष्टिकोन ठेवा. उद्योगध्ंाद्यात यश लाभेल. राजकीय, सामाजिक क्षेत्रांत तुमचे महत्त्व कमी करण्याचा प्रयत्न होईल. प्रवासात सावध रहा. अतिशयोक्ती टाळा.

शुभ दिनांक :15, 16

 

धनु

नावीन्यपूर्ण योजना आखाल

धनुच्या सप्तमेशात मंगळ, पंचमेशात रवी, बुध प्रवेश करीत आहेत. उद्योगधंद्यात नवी सुधारणा होईल. कुटुंबातील प्रश्न सर्वांच्या सहकार्याने सोडवण्याची जिद्द ठेवा. राजकीय, सामाजिक क्षेत्रांत नावीन्यपूर्ण योजना करण्याचा विश्वास निर्माण होईल. गुढीपाडव्याच्या दिवशी प्रेरणादायक घटना घडतील.

शुभ दिनांक :13, 14

 

मकर

कामे मार्गी लागतील

मकरेच्या षष्ठेशात मंगळ, सुखस्थानात सूर्य, बुध प्रवेश करीत आहेत. आठवडय़ाचा प्रत्येक दिवस उत्साहाचा ठरेल. धंद्यातील समस्या रेंगाळत ठेवू नका. परिचयातून कामे मार्गी लावता येतील. राजकीय, सामाजिक क्षेत्रांत व्यापक स्वरूपाचे कार्य होईल. नोकरीत तुमच्याबरोबर स्पर्धा करणारे वाढतील.

शुभ दिनांक :16, 17

 

कुंभ

जुने वाद मिटवता येतील

कुंभेच्या पंचमेशात मंगळ, पराक्रमात सूर्य-बुध राश्यांतर होत आहे. ठरविलेले प्रत्येक काम या आठवडय़ात पूर्ण करता येईल. मात्र कायदा मोडू नका. उद्योगधंद्यात वाढ होईल. जुने वाद मिटवता येतील. राजकीय, सामाजिक क्षेत्रांत तुमच्याबद्दल झालेला गैरसमज दूर करता येईल. नव्या दिशेने प्रगती होईल.

शुभ दिनांक :13, 14

 

मीन

संयमाने वागा

मीनेच्या चतुर्थात मंगळ, धनेश

ग्लोबल न्युज नेटवर्क: