राशिभविष्य : जाणून घ्या कसा असेल आजचा दिवस तुमच्यासाठी

ग्लोबल न्यूज: आजचे पंचांग – वार गुरुवारदि. 03.02.2022

शुभाशुभ विचार – उत्तम दिवस.

आज विशेष – साधारण दिवस.

राहू काळ — दुपारी 01.30 ते 03.00.

दिशा शूल – दक्षिणेस असेल.

आजचे नक्षत्र – शततारका 16.35 पर्यंत. नंतर पूर्वा भाद्रपदा.

चंद्र राशी – कुंभ.

—————————————-

आजचे राशीभविष्य

मेष (शुभ रंग – पिस्ता)

दैनंदिन सर्व कामे सुरळीत पार पडतील. कौटुंबिक सदस्यांमध्ये सामंजस्य राहील. आज तुमच्यासाठी इच्छापूर्तीचा दिवस आहे. काही अपुरी स्वप्ने पूर्ण होतील.

वृषभ- ( शुभ रंग- क्रीम)

नोकरीच्या ठिकाणी पदोन्नती होईल. तुमच्या अधिकारात वाढ होईल. सकारात्मक दृष्टिकोन ठेवणे हिताचे आहे. पिताश्री आज योग्य सल्ला देतील मित्रांना मात्र लांब ठेवा. कर्तव्याला प्राधान्य द्या.

मिथुन – ( शुभ रंग- स्ट्रॉबेरी )

कार्यक्षेत्रात काही बिकट प्रसंग यशस्वीपणे हाताळाल. तुमच्या प्रामाणिक मेहनतीस नशिबाची उत्तम साथ मिळेल. ज्येष्ठ मंडळींना उपासनेचे फळ मिळेल.

कर्क – (शुभ रंग- सोनेरी)

काही आरोग्यविषयक समस्यांना तोंड द्यावे लागेल. पोट बिघडणार आहे, खाण्यापिण्यावर ताबा गरजेचा तरुणांनी चुकीची संगत टाळणे हिताचे राहील.

सिंह- (शुभ रंग – पांढरा)

आज नोकरीच्या ठिकाणी काही मनाजोगत्या घटना घडतील. सहकारी तुमच्या मताचा आदर करतील.  इच्छित ध्येय साध्य होतील. वैवाहिक जीवनात गोडवा वाढेल.

कन्या – (शुभ रंग- गुलाबी)

आज काही अप्रिय माणसे संपर्कात येतील. मोफत सल्लगार मंडळीही भलतेच बोअर करतील. आज थोडा संयम बाळगण्याची गरज आहे. ऐकावे जनाचे करावे मनाचे हे लक्षात असूद्या.

तूळ -( शुभ रंग- मोरपिशी)

मंदावलेल्या व्यापार उद्योगास पूर्ववत गती येईल. आज तुम्हाला आपल्या आवडत्या क्षेत्रात नेतृत्वाची संधी मिळेल. महत्त्वाच्या चर्चेत आज तुम्ही आपल्या मतावर ठाम राहाल.

वृश्चिक – ( शुभ रंग- केशरी )

कामधंद्याच्या ठिकाणी तुमचे महत्त्व वाढेल. इतरांना न झेपणाऱ्या जबाबदाऱ्या स्वीकारून त्या पूर्णही कराल.  घराच्या नूतनीकरणाचे मनावर घ्याल. मुलांच्या अभ्यासातील प्रगतीने आनंदित व्हाल.

धनु – ( शुभ रंग-आकाशी)

नवीन व्यावसायिकांनी आपल्या मर्यादा ओळखूनच आर्थिक उलाढाली केलेल्या बऱ्या. आत्मविश्वासाचा ही अतिरेक नको, कारण त्याने निराशा पदरी पडू शकते.

मकर – (शुभ रंग- जांभळा)

आज तुमचे मनोबल उत्तम असेल. कार्यक्षेत्रात नवी आव्हाने आज आत्मविश्वासाने स्वीकाराल. विरोधकांना आज तुम्ही चोख उत्तर द्याल. लहान भावंडांस मदत कराल.

कुंभ -( शुभ रंग – सोनेरी)

आज फारच हट्टीपणाने वागाल. कुणाचेही ऐकून घ्यायची तुमची तयारी नसेल. अधिकारांचा गैरवापर महागात पडेल. आज कायद्याची चौकट मोडू नका.

मीन – ( शुभ रंग – निळा )

आज आर्थिक व्यवहारात सावध राहणे गरजेचे आहे. एकाच्या भरवशावर दुसऱ्याला शब्द देऊ नका. मोठ्या लाभाच्या मोहाने कुठेही असुरक्षित गुंतवणूक करू नका. घराबाहेर क्रोध काबूत ठेवा.

!! शुभम भवतु!!

श्री जयंत कुलकर्णी

फोन ९६८९१६५४२४.

( ज्योतिषी व वास्तू सल्लागार)

ग्लोबल न्युज नेटवर्क: