“आज विकास सोडून सर्व प्रकारचं केवळ राजकारण होतंय”

 

रशिया आणि युक्रेनमध्येसुरू असलेल्या युद्धाचा परिणाम तेथे शिक्षणासाठी गेलेल्या विध्यर्थी वर्गावर सुद्धा झालेला दिसून येत आहे अशातच युद्धात झालेल्या हल्यात एका भारतीय विद्यार्थाला आपला जीव गमवावा लागला आहे यावरूनच राष्ट्रवादीचे नेते, आमदार रोहित पवार यांनी युक्रेनमध्ये रशियन हल्ल्यात आपला जीव गमावणाऱ्या नवीन शेखरप्पा या विद्यार्थ्याच्या मृत्यूमुळे केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे. तसेच देशात आज विकास सोडून सर्व प्रकारचं केवळ राजकारण होत असल्याचा आरोपही त्यांनी ट्वीट करत केला आहे.

सध्याच्या परिस्थितीत आपल्याला रशियाकडून खूप काही शिकण्यासारखं आहे. जेव्हा एखादा देश एकाच व्यक्तीच्या विचाराने चालतो तेंव्हा त्याचे गंभीर दुष्परिणाम संपूर्ण देशाला भोगावे लागतात आणि आपणच बरोबर आहोत असं त्या नेत्याला वाटतं तेंव्हा त्याला थांबवणंही अवघड असतं. मात्र लोकशाही टिकवणं हे लोकांच्याच हाती असतं आणि लोकशाही चिरडण्याचा कुणी प्रयत्न करत असेल तर लोकांनीच पुढं येऊन ती वाचवण्याची गरज आहे. असेही रोहित पवार यांनी म्हटले आहे.

तसेच भारताबाबत विचार करताना आपल्याला संरक्षणावर खर्च करावाच लागेल पण आज महागाई आणि बेरोजगारीने अक्राळविक्राळ स्वरूप धारण केलं असताना मोठ्या प्रमाणात संरक्षणावर खर्च वळवणं आपल्यासारख्या देशाला परवडणार नाही. अन्यथा देशात अनेक अडचणी वाढू शकतात. असा इशाराही रोहित पवार यांनी दिला आहे.

Team Global News Marathi: